Tuesday, May 12, 2026
HomeBreaking“We’re Hiring” : मार्कंडेय पोदार लर्न स्कूलमध्ये शिक्षक भरती......

“We’re Hiring” : मार्कंडेय पोदार लर्न स्कूलमध्ये शिक्षक भरती……

Ajay Kandewar,Wani:- वणी येथील नामांकित मार्कंडेय पोदार लर्न स्कूल येथे शैक्षणिक सत्र 2026-27 करिता विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख असलेल्या या CBSE संलग्न शाळेत पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शाळेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार PPRT, PRT-English, TGT (English), TGT (Science), TGT (Computer Science), Dance Teacher (Female), PET (Male), Receptionist (Female) तसेच Peon या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

उमेदवारांकडे संबंधित पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे असून इंग्रजी संभाषण कौशल्य, संगणक ज्ञान व अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे.विशेष म्हणजे बाहेरील उमेदवारांसाठी ऑन कॅम्पस निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनाही ही उत्तम संधी ठरणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले Resume admin.markandeypls@podar.org किंवा principal.markandeypls@podar.orgया ई-मेलवर 16 मे 2026 पूर्वी पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 7820805742 – 9923991162 -9923991172 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page