•अखेर मागण्या झाल्या मान्य आणि काम देखील सुरू.
अजय कंडेवार,वणी:- वेकोली उकणी क्षेत्रा अंतर्गत उत्पन्न होणाऱ्या समस्या विरोधात गावकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन करणे करीता क्षेत्रीय महाप्रबंधक, वणी नार्थ क्षेत्र भालर यांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले होते. भाजपा वणी तालुका कोषाध्यक्ष तथा सरपंच दीपक मत्ते नेतृत्त्वात गावकऱ्यांचा दणक्याने दि.28 नोव्हेंबर रोजी “रास्ता रोकोचा” पहिल्याच दिवशी अखेर वेकोली प्रशासन नमले.
वणी नॉर्थ क्षेत्रात वेकोलीच्या मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असुन वेकोलीचे उत्पन्न पाहता सोइसुविधेचा अभाव मात्र नेहमीच वेकोलीकडून दिसून येतो .त्यामुळे जवळच असलेल्या खाणीतील विविध समस्येचा सामना परिसरातील गावकऱ्यांना करावा लागतो त्यामुळे विविध समस्येला कंटाळून पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी वेकोलीच्या विविध समस्यां विरोधात भाजपा वणी तालुका कोषाध्यक्ष तथा मा सरपंच दीपक मत्ते यांच्या नेतृत्वात २८ ला सकाळी ६ पासुन रास्तारोको आंदोलन पुकारले दरम्यान संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती.
वेकोली उकणी क्षेत्रा अंतर्गत मौजा पिंपळगाव कडे जाणाऱ्या पोच मार्गावर रस्ता लगत अंदाजे दहा फूट डम्पिंग आली होती.डम्पिंग घसरून जिवीत हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती तसेच गावाचा मार्ग नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे. मागील काही काळात डम्पींग घसरुन अनेक रस्ते बंद झालेले होते. असे डम्पिंग घसरण्याच्या अनेक दुर्घटना परिसरात पहिले पण घडल्या आहे. मात्र या समस्याकडे वेकोली अंतर्गत उपाययोजना न करता समस्येकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. असे निदर्शनास आले तसेच वेकोली निर्मित पिंपळगावाच्या पूर्वेस जे रस्त्याचे काम केल्या जात आहे तो रस्ता जमिनीपासून अंदाजे २५ ते ३० फूट उंच नियमबाहय रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे शेतामध्ये बैलगाडी वाहन वाहतुक करणे कठीन झाले होते.वेकोली उकणी क्षेत्राच्या निष्काळजी नियोजनामुळे पिंपळगांव स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व उकणी गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला. गेल्या काही वर्षापूर्वी वेकोली प्रशासनाने उकणी रस्ता हा 6 माहिन्यामध्ये नवीन पक्का रस्ता बनवून देऊ असे लिखित स्वरूपात आश्वासन देण्यात आले होते, मात्र अजूनही वेकोलीकडुन रस्ता तयार करण्यात आलेला नव्हता. म्हणुन या वेकोलीचा हुकूमशाही धोरणाचा विरोधात “रस्ता रोको”28 नोव्हें.रोजी करण्यात आले व विविध मागण्या वेकोलीने मान्य करीत काम देखील सुरु करण्यात आल्याने गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.