Tuesday, October 14, 2025
HomeBreaking Newsथर्टी फर्स्ट बाहेर साजरा करताय,तर सावधान ...!!!!

थर्टी फर्स्ट बाहेर साजरा करताय,तर सावधान …!!!!

•हुल्लडबाजांवर व मद्यपींवर पोलिसांची करडी नजर- गणेश किंद्रे (एसडीपीओ, वणी)

Ajay Kandewar,Wani:– नववर्षानिमित्ताने ठिकठिकाणी पार्टीचे नियोजन करण्यात आलेले असते.रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, ढाब्यांवर पार्टी करत सेलिब्रेशन करण्यात येत असते. मात्र असे करताना काहीजण हुल्लडबाजी करत गोंधळ घालत असतात. अशा हुल्लडबाजांवर व मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार असून पोलिसांचे पथक देखील ठिकठिकाणी तैनात राहणार आहे.तसेच थर्टीफर्स्ट निमित्ताने चालणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्याबरोबर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’च्या विरोधात पोलिस विशेष मोहीम राबविणार आहेत.शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रण कक्षातून शहरातील बारीक-सारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अशी माहिती वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे यांनी दिली.Wani Police keep a close eye on rowdy people and drunkards- Ganesh Kindre (SDPO, Wani)

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेल, आणि पर्यटनस्थळ, धार्मिक स्थळांवर नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर वणी उपविभागातील पोलीस दल सज्ज झाले असून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनुचित प्रकार घडू नये; म्हणून वणी उपविभागात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. वणी पोलीस निरीक्षक,API,पीएसआय ,पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments