•विदर्भातील सर्वात मोठी चॅम्पियन्स लीग बघण्याकरिता यावें असे समस्त जनतेला ॲड.कुणाल चोरडिया यांनी आव्हान केले.
अजय कंडेवार, वणी :- पारसमल प्रेमराज ज्वेलर्स प्रस्तूत T-10 चॅम्पियन्स लीग वणीचा पहिल्या ऐतिहासिक पर्व व विदर्भातील सर्वात मोठा T-10 चॅम्पियन लीग 6 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. या पहिल्याच मोसमासाठी ( T-10 चॅम्पियन्स लीग 2022) साठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या पर्वासाठी क्रिकेट टीमसह चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान या मोसमाआधी पुढील म्हणजेच ऐतिहासिक पहिल्याच (T-10 चॅम्पियन्स लीग 2022) शहरात चर्चा ही खूप होऊ लागली आहे. त्याचं कारणही तसंच आहे. या लीग मध्ये भव्य बक्षिसांचा वर्षावही आहे. हंगामात 10 टीम खेळताना दिसणार आहेत. याबाबतची माहिती ऍड. कुणाल चोरडिया यांनी दिली आहे.
या लिलावात एकूण 18 टिम सहभागी झाले होते .त्यापैकी केवळ 10 टीमचीच यात निवड करण्यात आली .यामुळे अनेक खेळाडू नशिबवान देखील ठरणार आहे.यासाठी खेळाडूंमध्ये तसेच चाहत्यांमध्ये जितकी उत्सुकता आहे, तेवढीच धाकधूकदेखील आहे. दरम्यान हा ऐतिहासिक पर्व अवघ्या काहीं दिवसातच सुरुवात होणार आहे. वणीतील भव्य दिव्य स्वरूपाचे एकमेव लीग मानल्या जात आहे.
यात प्रत्येक संघासाठी स्वतंत्र संघमालक आणि स्वतंत्र प्रशिक्षक आहेत. महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असणार आहे. साधारणतः भव्य प्रेक्षक बसतील एवढी मैदानाची एकूण आसन क्षमता असून T-10 चॅम्पियन लीग 2022 सर्वांसाठी विनामूल्य आहे.
T-10 चॅम्पियन चाहत्यांसाठी विविध माध्यमांमधून प्रक्षेपण :-
4 एचडी कॅमेऱ्याच्या साहाय्याने मैदानात लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर सामने दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रीव्हिव व रिप्लेच्या साहाय्याने सामन्यांच्या प्रक्षेपणात आकर्षकता आणली असून सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब चॅनलवर दाखविण्यात येणार आहे. T-1 0चॅम्पियन्स लीगच्या वतीने ‘टीसीएल’ मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून गूगल प्लेस्टोअर वरून ते डाऊनलोड करता येईल. WDZ या युट्युब चॅनेलवर हे सामने विनामूल्य पाहता येणार आहेत.