Ajay Kandewar,Wani – वणी शहरात जुगार मटका चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत मोठा झटका दिला आहे. दि. 27 जानेवारी 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या नेतृत्वाखाली वणी पोलिसांनी एकाच वेळी तीन ठिकाणी छापे टाकत वरली मटका अड्डे उद्ध्वस्त केले. भाजी मंडी परिसर, दीपक चौपाटी परिसर आणि सिंधी कॉलनी परिसरात एकाच वेळी झालेल्या या कारवाईमुळे जुगार माफियांमध्ये खळबळ उडाली.

भाजी मंडी परिसरात टाकलेल्या धाडीत गुन्हा क्र. 52/26 नुसार कलम 12(अ) मजुका 89 BNS अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून वरली मटका साहित्य व 3,410 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी विशाल मुरलीधर कोठडे (वय 45), शंकर श्रीराम ठमके (वय 49) आणि समीर कुंभकर्ण विश्वकर्मा (वय 19, सर्व रा. वणी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दीपक चौपाटी परिसरात झालेल्या कारवाईत गुन्हा क्र. 53/26 अंतर्गत 3,260 रुपये रोख व मटका साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये आकाश सुरेश मोहितकर (वय 22, रा. रंगनाथ नगर वणी), मिथुन मेघश्याम पोटे (वय 33, रा. वणी) तसेच मटका चालक शेख आरिफुल रेहमान (रा. सिंधी कॉलनी, वणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई सिंधी कॉलनी परिसरात करत गुन्हा क्र. 54/26 अंतर्गत 360 रुपये रोख व मटका साहित्य जप्त करण्यात आले असून मगेन्द्रा दुरई स्वामी (वय 21, रा. वार्ड क्र. 9, घुग्गुस, जि. चंद्रपूर) व फईमुद्दीन ताजुद्दीन शेख (रा. वणी) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या अचूक नियोजनाखाली सपोनि कपील पाटील, पोउपनि अंकुश वडतकर, पोहेकॉ विजय वानखडे, प्रदीप कवरासे, प्रदीप ठाकरे व पोको सुनील नलगंटीवार यांच्या पथकाने पार पाडली असून, एकाच वेळी तीन ठिकाणी धाड टाकत खाकीचा ठाम इशारा वणी शहराला देण्यात आला आहे.

