अजय कंडेवार,Wani:- वणी वकोली क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नकोडा गावालगत असलेल्या वर्धा नदीवर आवश्यक शासकीय परवानगी न घेता नकोडा मुंगोली रेल्वे ब्रिज बांधकामासाठी नदीपात्रामध्ये विना टीपी चे ओवरबर्डन नदीपात्रात टाकून रस्ता बनवणे व सिंचन विभागाची परवानगी न घेता नदीपात्रामध्ये पुलाचे बांधकाम सुरू आहे.या विषयाबाबत सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार रेल्वेची सबसिडी कंपनी “रायडर “व वणी वेकोली यांचे विरुद्ध कारवाई करावे तसेच अवैध बांधकाम थांबवावे याकरीता युवा सेना वणी विधानसभा समन्वयक आयुष ठाकरे यांनी कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग चंद्रपूर तसेच उपविभागीय अधिकारी ,पाटबंधारे उपविभाग ,चंद्रपूर यांना निवेदन दिले.Alas…!Mungoli Construction of bridge in riverbed without permission..
वणी वेकोली क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पैनगंगा-मुंगोलि या खदानी मधून येणाऱ्या काळात रेल्वे वाहतुकीने कोळशाची वाहतूक होणार आहे.यासाठी वणी वेकोलीने रेल्वे विभागाची सबसिडीरी रायटर नामक कंपनी यांना नकोडा ते मुंगोली मार्गे वर्धा नदी पात्रातून पुलिया बनवण्याचे मुख्य कॉन्ट्रॅकदार गणेश कार्तिकी कॉन्ट्रॅक्शन प्राव्हेट लिमिटेड सब कॉन्ट्रॅक्टर झेटवर्क मॅन्युफ्याकंचरिंग बिजनेस प्राव्हेट लिमिटेड यांना दिलेलं आहे. सदर नदी ही बाराही महिने वाहणारी नदी असून यावर कृषी सिंचन-पिण्याच्या पाण्याचे नियोजन या क्षेत्रात झालेले आहे .या ठिकाणी नदी पात्रामध्ये ब्रिजचे काम सुरु करतांना नियमानुसार काही शासकीय कागदोपत्री मंजुरात ठेकेदार व रायडर कंपनीला घेणे होते. परंतु त्यांनी राज्य शासनाच्या कुठल्याही नियमाचे पालन न करता बेकायदेशीररित्या नदीपात्रामध्ये सामान वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ओवरबर्डनची माती विना टीपी नदीपात्रामध्ये टाकून रस्ता लपविला तसेच पुलाचे पिल्लर उभे करण्यासाठी नदीपात्रामध्ये खोदकाम व बांधकाम केले. यासाठी आवश्यक नकाशा चंद्रपूर पाटबंधारे सिंचन विभाग यांच्याकडून मजूर केला नाही. किंवा (NOC)ना हरकत प्रमाणपात्र सुद्धा घेतलेले नाही. अश्या बे-जबाबदार कृत्यामुळे नदीपात्रामधील जलचलर प्राण्याच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तसेच पाणी सुध्दा दूषित झालेले आहे.
सदर कामें करणाऱ्या कंपनीने आवश्यक परवानगी न घेतल्यामुळे त्यांचे विरुद्ध कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी तसे तात्काळ काम थांबवण्याचे आदेश द्यावे ,अन्यथा शिवसेना उबाठा तर्फे कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, यामध्ये कंपनीचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी या कंपनीची राहील असा स्पष्ट इशारा या निवेदनातून सेना वणी विधानसभा समन्वयक आयुष ठाकरे यांनी दिला यासाठी निवेदनाचा प्रति उपविभागीय अधिकारी ,वणी,ठाणेदार शिरपूर, ठाणेदार घुग्गुस्,गणेश कार्तिकी कॉन्ट्रॅक्शन प्राव्हेट लिमिटेड व झेटवर्क मॅन्युफ्यकंचरिंग बिजनेस प्राव्हेट लिमिटेड यांना पाठविण्यात आलें.