अजय कंडेवार,Wani:- तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बांधकामांना व घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी रेती उपलब्ध होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया कामात अडथळा निर्माण होऊन ग्रामविकासात सुद्धा अडथळा निर्माण होत आहे. तसेच रेती अभावी घरकुल बनण्यासाठी अडथळा निर्माण होत आहेत. करिता योग्य ती उपाययोजना करून वणी तालुक्यातील शिरपूर / शिंदोला परिसरात शासनाने दिलेल्या घरकुल लाभार्थ्यांना व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावे, असे निवेदन वणी तालुक्यातील खांदला गावातील सरपंच हेमंत गौरकार यांनी वणी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शासनाने प्रधानमंत्री आवास योजना, शबरी, रमाई या योजनेतून विविध समाज घटकांना घरकुल देण्यात आलेले आहे. त्यासाठी शासनाकडून प्रती घर 5 ब्रास रेती रे घरपोच देण्यात आली .त्यासाठी ऑनलाईन पावती काढण्यात आली आहे. पावती काढून सुद्धा ती पावती ज्या डेपोची आहे. त्या डेपोवरती मागील ८ दिवसापासून रेती उपलब्ध नाही.येत्या दिवसांत पावसाला सुरुवात होणार आहे, शेतीचा हंगाम सुरु होणार आहे.अश्या परिस्थितीत लाभार्थ्यानाहीं घर बांधायचे कसे ? पावसाळ्यात भयंकर स्थिती लाभार्थ्यासमोर उभी झाली आहे आणि विशेष म्हणजे रेती मिळण्याची तारीख ही 6 जुन होती परंतु लाभार्थ्यासाठी ऑनलाईन पावती सोबत असतांना सुद्धा रेती डेपोवर रेती उपलब्ध होत नाही आहे. तसेच खांदला गावातील १५ घरकुल लाभार्थ्याना अजून पर्यंत 1 ब्रास सुद्धा रेती मिळालेली नाही, अश्या परिस्थितीत काम बंध पडले आहे. पावसाळ्यात घरकुल लाभार्थ्याना त्रास सहन करावा लागू शकतो.
शासनाने लाभार्थ्यांना घरकुलासाठी मोफत रेती उपलब्ध व्हावी, यासाठी डेपो हि संकल्पना राबवलेली होती परंतु या संकल्पनेचे “तीन तेरा वाजले” असून प्रशासनाने जातीने लक्ष घालून शिंदोला येथील डेपो नं 1 व २ वर त्वरित रेती उपलब्ध करून द्यावी .शिंदोला येथील दोन्ही डेपोवर येत्या २-३ दिवसांत रेती उपलब्ध न झाल्यास तहसिलसमोर ३ दिवसानंतर लाभार्थ्यांना सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल. असा स्पष्ट इशारा देखिल निवेदनातून देण्यात आला.