•9 लाखापेक्षा अधिक मुद्देमाल जप्त.
अजय कंडेवार,वणी :- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा हद्दीतील करंजी गावात शासकीय धान्याची अवैधरीत्या वाहतुक करणारे वाहन व अवैधरीत्या देशी दारूचा साठा विक्रीकरीता चारचाकी वाहनात नेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. व त्यात एकुण 9 लाख 49 हजार 300 रु.मुद्देमाल L.C.B पथकाने जप्त केला .
अवैध धान्याची कारवाई…….
पांढरकवडा – करंजी मार्गे राष्ट्रीय महामार्गाने मालवाहू गाडी क्रमांक MH -20DE-2434 या वाहनाने स्वस्त धान्य दुकानात शासनातर्फे पुरवठा करण्यात येणारे तांदुळ विक्री करीता अवैधरीत्या हिंगणघाटकडे घेऊन जाणार अशी माहिती मिळताच,ग्रामीण रुग्णालय करंजी जवळील पुलाजवळ सापळा लावून पांढरकवडयावरुन येणारे मालवाहू वाहनाला थांबविले असता,वाहनात चालक व त्याचे सोबत एक इसम सुनिल सूर्यभान वड (वय ४५ वर्षे) रा. कोधारा ता. केळापुर, मोरेश्वर अन्नाजी डेहणकर (वय ५६ वर्षे) रा. शास्त्री नगर पांढरकवडा यांचा मालवाहू गाडीत 80 पोत्यामध्ये 30 क्विटल तांदुळ भरलेला दिसला. दोन्ही इसमांना तांदुळ साठयाचे कागदपत्र व तांदुळ कोठुन आणला व कोठे नेणार आहे याबाबत विचारपुस केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तरे न दिल्याने सदरचा साठा हा शासकीय धान्यांचा असू शकतो असा वाजवी संशय निर्माण झाल्याने तांदळा साठा अंदाजे 30 क्विटल किंमत लाख रू. व मालवाहू वाहन किंमत 3 लाख रुपये असा एकूण 4 लाख रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला व पुढील कायदेशीर कारवाई करीता तहसिलदार पांढरकवडा यांना पत्र देण्यात आले.
अवैध दारूची ही कारवाई…..
त्यानंतर त्याच करंजी गावातच सदर कारवाई करीत असतांना करंजी गावात वार्ड क्र.2 येथे गर्जन खेरे हा त्याचे घरात व घरासमोरील सिल्वर रंगाचे S-Cross वाहन क्रमांक MH 40 AR -3802 यामध्ये देशी दारुचा अवैध साठा व घरात देशी दारु रुपेश संत्राच्या १८० एमएल च्या एकुण ३४४ नग बॉटल किंमत २४.०८०/- रुपये व त्याचे घरासमोरील वाहन क्रमांक MH४०/AR/३८०२ यात देशी दारुच्या १८० एमएलच्या ९६ नग बॉटलव ९० एमएलच्या ३०० नग बॉटल असा एकुण किमत ११.२२०/- रुपये व चारचाकी वाहन किंमत ५,००,००० रुपये असा एकुण ५,४१,३०० रुपयाचा मुददेमाल जप्त करुन पोस्टे पांढरकवडा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई वरिष्ठांचा मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने (पोलीस निरीक्षक, स्वा.गु.शा. यवतमाळ),सपोनि अमोल मुडे, योगेश डगवार ,सुनिल खंडागळे, प्रशांत हेडाऊ, सुधीर पांडे, निलेश निमकर, भोजराज करपते, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी ,सतीश फुके सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्विरित्या पार पाडली आहे.