अजय कंडेवार,वणी — महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) चा निकाल 27 मे .2024 रोज सोमवारला दुपारी 1.00वाजता ऑनलाईन घोषित झाला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जनता विद्यालयाच्या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली .Great success of the students of Janata Vidyalaya in Wani.
यामध्ये जनता विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रुती पिसाराम वाढई हिने 93.80 % गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली आहे.व तिला संस्कृत या विषयात 100पैकी 100गुण आहे.भावेश सुनील उपरे ह्याने 92.20% गुण मिळवून द्वितीय तर साहिल दिलीप खिरटकर ह्याने 90.40% व जतीन रविकांत भोयर 90.40% गुण मिळवून शाळेतून तृतीय आला आहे. त्याचप्रमाणे कु. अष्टांगी चंदू परेकर हिने 90.00% मिळवून चौथा क्रमांक, तसेच कु.श्रावणी यादव महातळे व कु.श्रुष्टि भालचंद्र गालेवार या दोघांनी 89.20% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहेत.
दहावीचा परीक्षेत “शंकावार ” परिवारातील दोन्हीं मुली शाळेतून गुणवत्ता यादीत…
कु. आर्या महेश पठाडे 88.20 या सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर च्या अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई अशोकराव जीवतोडे ,उपाध्यक्षअंबर अशोकराव जिवतोडे , सचिव डॉ. अशोकराव जीवतोडे व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एम.डी. जोगी ,उपमुख्याध्यापक डी. एस.बोबडे ,पर्यवेक्षक व्ही. एस आसुटकर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मिठाई भरवून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे सर्व शिक्षकांना व पालकांना दिले आहे.नेहमीप्रमाणे विद्यालयाने यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवण्यात यश मिळविले आहे