अजय कंडेवार,वणी:- मुकुटबन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सिंधी वाढोणा येथील ३२ वर्षीय इसमाने घरचा आडोशाला दोरीचा साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.”Bhalchandra” hanged himself…@Suicide#
झरी तालुक्यातील सिंधी वाढोणा येथील भालचंद्र संतोष आवारी हा इसम शुक्रवारी सकाळीं १०.३० वाजताचा सुमारास घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत घरचा आडोशाला दोरीचा साहाय्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. ही बाब कुटुंबियांना लक्षात येताच घटनास्थळी धाव घेतली आणि मुकुटबन पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.
ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती आहे. आत्महत्या करण्याचे कारणही अद्याप अस्पष्ट आहे.पुढील तपास मुकुटबन पोलीस ठाण्यातील पोलीस करीत आहे. वणी उपविभागात आत्महत्येच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.