•मंदर येथील घटना.
अजय कंडेवार,वणी :- “मोबाईल गेला तेव्हा तिथे फक्त तुच हजर होता. तु जर मोबाईल देशील नाही तर तुझी गावभर बदनामी करतो आणि पोलीस रिपोर्ट देतो अशी धमकी दिली असता” अश्या यांच्या बदनामीला व धमकीला कंटाळून शेतकरी बंडू केशव बूच्चे (वय 50 वर्ष) रा. मंदर, जिल्हा यवतमाळ यांनी 25 ऑक्टोबर 2023 रोजी स्वतःचा शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केल्याची खळबळजनक घटना घडली होती आणि तब्बल 15 दिवस त्याचावर शहरातील एका खाजगी इस्पितळात उपचार सुरू होते परंतू नशिबाला काही वेगळेच मंजुर होतें आणि ऐन दिवाळीचा तोंडावरच त्या “बंडू”नी शेवटचा श्वास सोडला.या प्रकरणी मंदर येथील चार जणांवर वणी पोलिसांत रितसर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा पोलिसांत रविवारी (12 नोव्हेंबर) 2023 रोजी दाखल झाला.
सविस्तर,नेहमीप्रमाणेच बंडू केशव बूच्चे (वय 50 वर्ष) रा. मंदर, जिल्हा यवतमाळ व अनिता बंडु बुच्चे (वय 42 वर्षे) रा. मंदर ता. वणी जि. यवतमाळ हे दोघेही दि.25 ऑक्टोबर 2023 रोजी घरी बसून घरगुती चर्चा करीत होते. तेव्हाच बाहेरून काहीं मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला असता, अनिता बूच्चे बाहेर आली आणि तिने पाहिले की,गावातीलच वैशाली थाटे (वय 35 वर्ष),सुनिता दिलीप येवले (वय 45 वर्ष), सुमित दिलीप येवले (वय 28 वर्ष) सुहास संजय गोवारकर (वय 26 वर्ष ) हे चार जण घरात येऊन बंडू बुच्चे यावर मोबाईल चोरून घेवुन आले असे आरोप लावीत घरात घुसून मोबाईल शोधण्याकरीता घरातील सामान अस्थाव्यस्थ केले.परंतू काहीं आढळले नाही.”मोबाईल गेला तेव्हा तिथे फक्त तुच हजर होता. तु जर मोबाईल देशील नाही तर तुझी गावभर बदनामी करतो आणि पोलीस रिपोर्ट देतो अशी धमकी दिली.”असता त्या बदनामीचा आरोपाने रडत रडत बंडू बूच्चे हा घरातून त्याच क्षणी निघून गेला व 25 ऑक्टो.रात्री 8.00 वाजताच्या दरम्यान शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केल्याची खळबळजनक घटना घडली आणि तब्बल 15 दिवस त्यावर शहरातील एका खाजगी इस्पितळात उपचार सुरू होते परंतू त्यांचा वाढत असलेला खाजगी इस्पितळाचा खर्च सोसला जात नसल्याने बंडू बुच्चे यांना ता.4 नोव्हें.रोजी चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले परंतू नशिबाला काही वेगळेच मंजुर होतें आणि ऐन दिवाळीचा तोंडावरच ता.8 नोव्हें रोजी “बंडू बूच्चे”नी शेवटचा अखेरचा श्वास सोडला.
मयत बंडू बुच्चे यांच्या पत्नीने वणी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल करताच वैशाली थाटे (वय 35 वर्ष),सुनिता दिलीप येवले (वय 45 वर्ष), सुमित दिलीप येवले (वय 28 वर्ष) सुहास संजय गोवारकर (वय 26 वर्ष )चार जणांवर वणी पोलिसांत रितसर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा पोलिसांत रविवारी (12 नोव्हेंबर) 2023 रोजी दाखल झाला. 306 ,34भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे एकाचा निष्पाप जीव तर गेला, परंतू आई आणि 3 मुलीही पोरके झाले आहे.