•आता वाहतुकीला शिस्त लावणार.
अजय कंडेवार,वणी:- शिरपूर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार गजानन करेवाड यांचा ठरलेला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला व 14 सप्टें. रोजी यवतमाळ जिल्हा नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले . शिरपूर येथे सपोनि गजानन करेवाड यांनी शिरपूर ठाण्याचा कारभार अतिशय योग्य पद्धतीने हाताळला होता तर याच कामाची पावती म्हणून अखेर यवतमाळ पोलिस अधिक्षक डॉ.पवन बंसोड (पोलीस अधीक्षक यवतमाळ) यांनी API गजानन करेवाड यांची जिल्हा वाहतूक उपशाखा ,पांढरकवडा येथे प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आणि 21 सप्टें.रोजी API करेवाड यांनी जिल्हा वाहतूक उपशाखेचा पदभार देखील हाती घेतला.API Gajanan Karewad District Traffic Sub-Division Head Appointment.
API गजानन करेवाड यांनी तपास यंत्रणा कार्यक्षम ठेवत गुन्हे आटोक्यात आणले. त्या प्रमाणेच घडलेल्या अनेक गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात आले. हत्या, चोरी आणि अन्य गुन्ह्यातील आरोपींना शिताफीने ताब्यात घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले.अनेक धडाकेबाज कारवाया केल्या. अनेक मोठ मोठ्या गुन्हातील आरोपींचा मुसक्या दाबल्या .ठाणेदार गजानन कारेवाड यांनी वेळोवेळी क्लिष्ट गुन्ह्याचा तपास कौशल्यपूर्ण दाखवून “गुन्ह्यांना माफी नाही” हे देखिल अनेकदा सिद्ध करून दाखविले.याच कार्याची पावती म्हणून यवतमाळ पोलिस अधिक्षक डॉ.पवन बंसोड (पोलीस अधीक्षक यवतमाळ) यांनी API गजानन करेवाड जिल्हा वाहतूक उपशाखा प्रमुखपद बहाल केले. आता जिल्हा वाहतूक उपशाखेत वाहतुकीला लगाम लावणार यात शंका नाहीच आणि यवतमाळ पोलिस अधिक्षक यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत सुलभरित्या पार पाडणार यातही या धडाकेबाज अधिकाऱ्याकडून तिळमात्र शंका नाही. कारण म्हणतात ना…API करेवाड शिस्तीत कडकच. त्यांची पांढरकवडा येथे वाहतूक शाखा प्रमुखपदी नियुक्त झाल्याची माहिती कळताच वणी व शिरपूर परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.