अजय कंडेवार,Wani:- दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. दोघांनीही विवाह करायचा ठरविला. मात्र, त्याला कुटुंबीयांचा विरोध होता. विरोध झुगारून दोघानीही विवाह केला. कालांतराने मोलमजूरी करून दोघांचा संसार सुरू झाला. मात्र, कालांतराने दोघांत बिनसले. त्यातूनच पतीने घटस्फोट मागितला. प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, याच दरम्यान बिवाहितेचा ७ जूनच्या रात्री पुसद बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या एका लॉजमध्ये विक्स अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकरणी विवाहितेच्या माहेरच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीचा खून झाला आहे, अशी तक्रार केली आहे. एकंदरीत प्रेमविवाहाचा शेवट रक्तरंजीत झाल्याने शहरात खळबळ उडाली.A naked body was found in the lodge
सपना संजय मोरे असे मृतक विवाहितेचे नाव आहे. तर लक्ष्मण गणपत पाईकराव (५८) रा. बोरगडी असे फिर्यादीचे नाव आहे. पाईकराव हे मृतक सपनाचे बडील आहे. तर संजय प्रदीप मोरे (२७) रा. निंबी असे गुन्हे दाखल झालेल्या सपनाच्या पतीचे नाव आहे. पुसद शहर पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार सपना व संजय यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यामुळे २०२२ मध्ये दोघांनी प्रेमविवाह करायचा ठरविले. मात्र, त्यांच्या विवाहाला कुटुंबातील सदस्यांची मान्यता नव्हती. मात्र, दोघेही विवाह करण्यावर ठाम होते. त्यांनी कुटुंबीयांचा विरोध झुगारून ११ मे २०२२ रोजी दारव्ह्यातील सम्राट अशोक बुद्धविहारात विवाह केला. विवाहानंतर मोलमजुरी करून दोघे उदरनिर्वाह करीत होते. लग्नानंतर संजयने सहा महिने सपनाला चांगले चागविले. मात्र, दोघात त्यानंतर छोट्या-छोट्या कारणावरून कुरबुरी वाढल्या. त्यातून संजय सपनासोबत भांडू लागला. सहा महिन्यापूर्वी पतीचा त्रास होत असल्याने सपनाने पतीविरुद्ध कौटुंबिक अत्याचाराची पोलिसात तक्रारही केली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या ४९८ (अ) नुसार गुन्हा नोंदवून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. यामध्ये पती संजय सपनाला घटस्फोट मागत होता. पुसदच्या न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण दाखल होते. या दरम्यान संजय हा अधुनमधून माहेरी बोरगडी येथे असलेल्या पत्नी सपनाला भेटायला ये-जा करायचा.
७ जूनला पुसद न्यायालयात तारीख असल्याने मृतक सपना व तिचा पती संजय मोरे हे दोघेही बसस्थानकाच्या मागील बाजूला शनिमंदिरालगत असलेल्या सनी लॉजवर गेले. दुपारी १ वाजता ते रूम नं. १०८ मध्ये थांबले होते. सायंकाळी संजयने नाश्ता व पाण्याची बॉटल आणून रूममध्ये ठेवली होती. मात्र, त्यानंतर तिथे दोघात बाद झाला. सपनाच्या ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून करून संजय पसार झाला. बराच उशीर होऊनही सपना व तिचा पती बाहेर न आल्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब मालक देवेंद्र खडसे यांना सांगितली. लॉजमालकाने सायंकाळी ७ वाजता रूमजवळ जाऊन आवाज दिला. मात्र, आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर खडसे यांनी शहर ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जाऊन बघितले तर दार अॅटोमॅटीक आतून बंद होते. त्यामुळे दार तोडून पोलिसांना रूममध्ये शिराचे लागले. मात्र, विवाहित सपना दिवानवर विवस्त्र अवस्थेत मृत पडलेली होती.
विवाहिता सपना हिचा सनी लॉजमध्ये विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने पोलिसांना तिचा खून झाल्याची खात्री झाली. तपासचक्रे फिरवून पोलिसांच्या पथकाने पतीचा त्रास होत असल्याने सपनाने पतीविरुद्ध कौटुंबिक अत्याचाराची पोलिसात तक्रारही केली होती. त्यावरून पोलिसांनी भादंविच्या ४९८ (अ) नुसार गुन्हा नोंदवून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. यामध्ये पती संजय सपनाला घटस्फोट मागत होता. पुसदच्या न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण दाखल होते. या दरम्यान संजय हा अधुनमधून माहेरी बोरगडी येथे असलेल्या पत्नी सपनाला भेटायला ये – जा करायचा. संजय नेहमी भांडण करूण तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना धमकी द्यायचा असे तक्रारीत नमूद आहे.विशेष सपना चांगली शिकलेली होती, त्यामुळे ती पुसद येथे स्पर्धा परीक्षेचेही तयारी करीत होती. दरम्यान, ४ जूनला सपना ही बोरगडी येथे वडिलांच्या घरी गेली होती. थोडा वेळ पांबून ती परत पुरादला निघून -तीन दिवसांपूर्वी पुसद येथे कोर्टात तारीख असल्याने सध्य व तिचे वडील कोर्टात गेले होते. दरम्यान यावेळी संजयाने पत्नी सपनाला फोन करून तू फारकत दे, नाहीतर तुला खत्म् करून टाकतो, अशी धमकी दिली होती, असे तक्रारीत नमूद आहे.
मात्र, या दरम्यान ७ जूनचा रात्री दाने ९ वाजताच्या सुमारास सपनाच्या वडिलांच्या घरी गावचे पोलीस पाटील नामदेव आले. त्यांनी फिर्यादीला तुमची मुलगी ही पुसदच्या सनी प्राईड लॉजवर मरण पावल्याचे सांगितले. यामुळे सपनाच्या वडिलाच्या जीवाचा थरकाप उडाला. त्यांनी लगेच लॉजवर येऊन पहिल्या माळावरील १०८ मध्ये जाऊन बघितले असता ती मृतावस्थेत पाहून वडिलाने एका हंबरडा फोडता लॉज मालकाला विचारले तर त्यांनी दुपारी १ वा दरम्यान अपना ही तिचे पती संजय मोरे सोबत आली होती. असे सांगितले. एकंदरीत वडिलांना सर्व प्रशारकडून चुकला, पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनानंतर सपनाचा मृतदेह वडिलांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील तपास पुसद पोलीस करीत आहे.