Friday, May 1, 2026
Homeवणी'गांधी का मरत नाही ?' या विषयावर रविवारी जाहीर व्याख्यान.....!

‘गांधी का मरत नाही ?’ या विषयावर रविवारी जाहीर व्याख्यान…..!

•महात्मा गांधी यांच्या विचारांची नितांत गरज आहे. त्यासाठीच या व्याख्यानाचे आयोजन – डॉ.लोढा(मुख्य समन्वयक)

अजय कंडेवार,वणी: गांधी जयंती सप्ताहनिमित्त रविवार ता. (8.ऑक्टो) रोजी संध्याकाळी 6 वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे गांधी विचारांचे प्रखर वक्ते चंद्रकांत वानखेडे यांचे ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. वणी विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

विशेषतः या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे राहणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार वामनराव कासावार राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवकवर्ग उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page