Thursday, April 30, 2026
Homeवणीस्कूल बसचा वापर सर्रास लग्नसमारंभासाठी...!

स्कूल बसचा वापर सर्रास लग्नसमारंभासाठी…!

संस्थाचालकाचा वरकमाई करण्याचा नवीन फंडा.

• विशेषतः बॅच नसलेले ड्राइव्हर बस चालवित असल्याची धक्कादायक माहितीही…

अजय कंडेवार,वणी:-शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कूल बसचा वापर सुट्यांमध्ये सर्रास लग्नाच्या वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी करण्यात येत आहे. स्कूल बस ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ कार्यालयात प्रवासी कर भरावा लागतो; तर स्कूल बससाठी ही सूट दिली जाते. म्हणूनच स्कूल बसमधून प्रवासी वाहतूक करता येत नाही.School bus is widely used for weddings…!

स्कूल बसमधून प्रवाशांची वाहतूक करणे हे बेकायदेशीर आहे. या संदर्भात परिवहन विभागाने वारंवार परिपत्रके काढलेली आहेत; मात्र शासकीय आदेशाला स्कूल बसचालकांकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने अन्य वाहनांच्या तुलनेत स्कूल बस कमी दरात मिळत असल्याने सर्रास लग्नाच्या वऱ्हाडाला स्कूल बस भाड्याने देण्याचा सपाटा  संस्थाचालकांनी लावला आहे.

विशेष म्हणजे वाहतूक शाखा  त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यंदा मात्र अशी कारवाई केल्याचे दिसत नाही. त्यामुळेच संस्थाचालकांनी सर्रास वरकमाई करण्याचा नवीन फंडा शोधला आहे. यामुळेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी महामंडळासह अन्य खाजगी वाहनांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यावर वाहतूक शाखा काही कारवाईचे संकेत देईल का याकडे लक्ष…..

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page