वणी – कायर येथील विवेकानंद विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने 17 ऑगस्ट 2022 रोजी विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11.00 वाजता सामूहिक राष्ट्रगाण म्हणण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेखा मडावी , सहायक शिक्षक सुरेंद्र इखारे, मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, सोनाली भोयर, शिक्षकेत्तर कर्मचारी मधुकर कोडपे ,दिलीप कांदसवार, आकाश बोरूले उपस्थित होते. शासनाचे आदेशानुसार सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले त्याच बरोबर शालेय प्रार्थना ,प्रतिज्ञा व संविधान वाचन करण्यात आले त्यानंतर गितगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा व वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गितगायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा या स्पर्धात सहभाग घेऊन प्रथम व द्वितीय येणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली भोयर यांनी केले तर आभार मधुकर घोडमारे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
विवेकानंद विद्यालयात सामूहिक राष्ट्रगाणं संपन्न
RELATED ARTICLES

