Ajay Kandewar,Wani :- शहरात सोलर हायमास्ट, सोलर स्ट्रीट लाईट आणि सोलर ट्री उभारणीच्या कोट्यवधी रुपयांचा कामावर आता गंभीर गबाड संशय निर्माण झाला आहे. संबंधित घेतलेल्या या कामात प्रत्यक्ष अंमलबजावणी, साहित्याचा वापर आणि खर्चाच्या हिशेबाबाबत नागरिकांकडून आक्षेप घेतले जात आहेत. विशेषतः ४०० लाईटचा मुद्दा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, मंजूर संख्येच्या तुलनेत प्रत्यक्ष किती लाईट बसविण्यात आले, किती कार्यरत आहेत आणि उर्वरित साहित्याचे काय झाले, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या कोटींच्या सार्वजनिक निधीतून झालेल्या कामाचा दर्जा आणि प्रत्यक्ष उपयोगिता तपासल्याशिवाय या प्रकरणातील संशय दूर होणार नाही.

स्वतःला वणीचा स्वयघोषित जणू राजा समजून वावरणाऱ्या त्या “गेंडूरगिटक्या” च्या कारभारावर आता संशयाची छाया गडद होत आहे. प्रशासनाला जुमानत नसल्याच्या चर्चेत असलेल्या या ठेकेदाराच्या कामाची आता कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष स्थळपाहणी करून तपासणी होणे आवश्यक आहे. संबंधित विभागाने निविदेतील अटी,मंजूर अंदाजपत्रक,प्रत्यक्ष बसविलेल्या लाईटची संख्या,साहित्य खरेदीची बिले आणि ठेकेदाराला अदा केलेली रक्कम सार्वजनिक करावी. गरज पडल्यास स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करून दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. विकासाच्या नावाखाली जनतेचा पैश्याची उधडपट्टी करणाऱ्या “गेंडूरगिटक्याला” सार्वजनिक पैशांचा हिशेब द्यावाच लागणार आहे. ४०० लाईटचा हिशेब आणि संपूर्ण कामाचे सत्य बाहेर येईपर्यंत या सोलर प्रकल्पावरील संशय कायम राहणार आहे.


