Ajay,Wani:- तालुक्यातील चिखलगाव-लालपुलिया परिसरातील कोळसा प्लॉट हटविण्याचा प्रश्न तब्बल २२ वर्षांपासून प्रलंबित आहे. या काळात अनेक निवेदने, आंदोलने, आश्वासने आणि “संघर्षाच्या “घोषणा मोठ्या बोम्या झाल्या; मात्र नागरिकांच्या पदरी ठोस परिणामाऐवजी “निराशाच” आली. चिखलगाव, राजूर आणि मेघदूत कॉलनी परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असताना आता केवळ “संघर्षाच्या” नावाखाली वेळ घालवणे परवडणारे नाही, अशी भूमिका पुढे येत आहे. याच पार्श्वभूमीवर लढा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खानझोडे यांनी कंबर कसली असून, “जुन्या संघर्षाला फाटा” देत आता थेट “लढ्याची” भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा केवळ निवेदनांचा विषय नसून तो जनतेच्या जगण्याशी निगडित असल्याने नव्या आणि मजबूत टीमनेही या आंदोलनासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
दरम्यान, दिवाळीनंतर १३ नोव्हेंबर रोजी राजूर रिंग रोडवर चक्काजाम आंदोलनाचा निर्धार करण्यात आला आहे. लालपुलिया येथील कोळसा प्लॉट हटविणे, राजूर रिंग रोड परिसरात कोळसा प्लॉटला प्रतिबंध करणे आणि प्रदूषणाच्या प्रश्नावर प्रशासनाला ठोस निर्णय घेण्यास भाग पाडणे, हा या आंदोलनामागील प्रमुख उद्देश आहे याच विशेषता “नो टाईम वेस्ट, नो तारीख पे तारीख …. बस ओन्ली रिझल्ट” याकडे लक्ष असल्याची बाब समोर येत आहे. फटाके, ॲटम- बॉम्ब आणि इतर प्रतीकात्मक घोषणांच्या माध्यमातून आंदोलनाची तीव्रता दाखविण्याची तयारी असली, तरी आंदोलन शांततापूर्ण व कायद्याच्या चौकटीत राहणार का, याकडेही लक्ष लागले आहे. “निव्वळ संघर्षानंतर” आता जनतेला आश्वासन नको, तर प्रत्यक्ष “Result “हवा आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबरचा चक्काजाम हा लालपुलियाच्या प्रदूषणविरोधी “लढ्याला” निर्णायक वळण देणार की या “खंभीर लढ्याचा” आंदोलनानंतर लालपुलियासह रिंग रोडवरचे कोळसा प्लॉट उठणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

