Ajay ,Wani : कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या धोकादायक इमारतीचा प्रश्न गंभीर बनला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेला दोन नवीन वर्गखोल्या तात्काळ बांधून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना याबाबत निवेदन देण्यात आले. शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे २३ विद्यार्थी शिक्षण घेत असून, धोकादायक वर्गखोल्यांमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीपासूनच शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
निवेदनात म्हटले आहे की, २४ ऑगस्ट रोजी सकाळी शाळा सुरू असताना वरांड्याच्या भिंतीचा भाग कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धोकादायक दोन वर्गखोल्या पाडून त्याठिकाणी नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात यावे, तसेच तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. कवडशी परिसर खानबाधित क्षेत्रात येत असल्याने वेकोली तसेच उपलब्ध शासकीय निधीतून दोन वर्गखोल
या निवेदनावर महादेव दातारकर, वंदना काकडे, संध्या धूमणे, छाया चिठे, चंद्रकांत भेंडाळे, सुलोचना बुच्चे, रेश्मा वासेकर, विद्या येटें , वनिता येसेकर, आदींचे स्वाक्षऱ्या आहेत. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने विलंब न करता दोन नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामास मंजुरी देऊन काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

