टिप:- (विदर्भ न्यूज च्या आधीच्या बातमीमध्ये शिवसेना उबाठा गटाच्या चिन्ह ऐवजी धनुष्यबाण हे चिन्ह ग्राफिक्स मध्ये बदल करत असताना चुकी झाली होती.🙏)
Vidarbh News Wani :- वणी विधानसभा प्रमुख तथा चिखलगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. सुनीलभाऊ कातकडे यांचा वाढदिवस शनिवार, दि.१८ जुलै रोजी उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह असंख्य कार्यकर्ते, मित्रपरिवार व ग्रामस्थ त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणार आहेत. महादेव नगरी, चिखलगाव येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सुनीलभाऊ कातकडे हे केवळ राजकारणी नाहीत, तर जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षांपासून त्यांनी चिखलगाव परिसरातील नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. कोणताही नागरिक मदतीसाठी त्यांच्या दारात आला तर त्याला शक्य ते सहकार्य करण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता आहे. ग्रामपंचायत स्तरापासून सामाजिक उपक्रमांपर्यंत त्यांनी सक्रिय सहभाग घेत गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. ते उबाठा गटाचे वरिष्ठ नेते संजय देरकर यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात. पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांना नेहमी बळ देण्याची भूमिका यामुळे त्यांनी वणी विधानसभा मतदारसंघात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकारणाबरोबरच समाजकारणाची सांगड घालत युवकांना प्रेरणा देणे, सर्व समाजघटकांना एकत्र ठेवणे आणि जनतेशी कायम नाळ जोडून काम करणे, हीच त्यांची खरी ताकद मानली जाते.
चिखलगावच्या राजकीय व सामाजिक जीवनात सुनीलभाऊ कातकडे यांचे नाव विश्वास, कार्यतत्परता आणि जनसेवा यांचे प्रतीक मानले जाते. ग्रामपंचायतीतील लोकाभिमुख कामांमुळे तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते गावातील सर्वांचे आवडते नेतृत्व बनले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी असंख्य शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस अधिकाधिक यश लाभावे, अशीच भावना त्यांच्या समर्थक व हितचिंतकांकडून व्यक्त केली जात आहे.

