Saturday, May 2, 2026
HomeBreakingब्रेकिंग : चिखलगाव ग्रामपंचायत –विकास फक्त विना लोकांचा "त्या एका नगरीचा "?

ब्रेकिंग : चिखलगाव ग्रामपंचायत –विकास फक्त विना लोकांचा “त्या एका नगरीचा “?

Ajay Kandewar,Wani:- चिखलगाव ग्रामपंचायतीचा तथाकथित विकास आता पूर्णपणे उघड झाला असून, MGNREGA मधून झालेले रस्ते म्हणजे विकास नव्हे तर गावकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचा थेट आरोप होत आहे. अडीच वर्षे सत्ता हातात असताना ग्रामपंचायतीने नेमके काय केले, हा प्रश्न आता गावकऱ्यांच्या संयमाबाहेर गेला आहे. कारण संपूर्ण गावात चर्चा एकच आहे . जिथे लोकवस्ती नाहीं तिथे फक्त विकास “त्या नगरी”त  एका महिन्यात ओतला गेला आणि उरलेले गाव ,वॉर्ड अक्षरशः वार्‍यावर सोडले. अशी दबक्या आवाजात बोलल्या जात आहे.

गावकरी थेट सांगत आहेत की अडीच वर्षांत फक्त रस्त्यांच्या नावावर कागदी विकास दाखवण्यात आला. प्रत्यक्षात हे रस्ते पाहिले की विकास नव्हे, तर निष्कृष्ट दर्जाचा नमुना समोर येतो. मोरे लेआउटमध्ये मंजूर 84 मीटरचा रस्ता प्रत्यक्षात अर्धाच रस्ता गायब आहे. जो रस्ता दिसतो, त्याची अवस्था पाहून ग्रामपंचायतीच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उभे राहते. काही ठिकाणी तर “निव्वळ डस्ट टाकून” रस्ता झाल्याचे नाटक केल्याचा आरोप गावातून जोरात होत आहे.ISO ग्रामपंचायत असल्याचा शिक्का मारून मिरवणूक काढली जाते, पण ISO दर्जाचे काम कुठेच दिसत नाही, असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत. “ISO म्हणजे फक्त बोर्डापुरते का?” असा थेट टोमणा ग्रामपंचायतीला बसत आहे. विकासाच्या नावावर केलेला हा प्रकार म्हणजे बोगसपणाचा कळस असल्याची भावना गावात पसरली आहे.संपूर्ण गावात आता उघडपणे बोलले जात आहे की जिथे लोकवस्ती नाही “त्या नगरीचा विकास झकास आणि वॉर्डचा विकास भकास!” हाच अन्याय,हाच दुजाभाव सहन न झाल्यामुळे आठ सदस्यांनी थेट राजीनामे देत एल्गार पुकारल्याची चर्चा आहे.“आमच्या वर्गाचा विकास करा, आमच्या वॉर्डचा विकास करा,” हीच मागणी त्यांनी केली आणि ग्रामपंचायतीच्या कारभारावर थेट बोट ठेवले.

काही नागरिक आणि सदस्य तर थेट संतप्त सवाल करत आहेत .काम होणारच असेल, तर ते फक्त ‘त्या नगरी’तच का? संपूर्ण गावाचा विकास करायची जबाबदारी ग्रामपंचायतीची नाही का? ‘त्या नगरी’चे काम थांबवून आधी वॉर्डांचे काम करा ना, हो साहेब! असा सवाल आता दबक्या आवाजात नव्हे तर जाहीरपणे सदस्यांतर्फे केला जात आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर चिखलगाव ग्रामपंचायत झोपेत आहे की मुद्दाम डोळेझाक करत आहे, असा संतप्त प्रश्न उपस्थित झाला आहे. विकासाच्या नावावर बोंब, रस्त्यांच्या नावावर बोगस कामे आणि गावकऱ्यांच्या सहनशक्तीची अखेर हीच आजची चिखलगाव ग्रामपंचायतीची ओळख बनत चालली आहे.आता गाव एकच सवाल विचारत आहे .अडीच वर्षांचा विकास गेला कुठे? झाला कसा? आणि तो इतका बोगस का ठरतोय?ग्रामपंचायत यावर खुलासा करणार की गावकऱ्यांचा रोष आणखी भडकणार, हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page