Ajay kandewar,Wani:- :- महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले “महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४” हे Maharashtra Public Security Bill 2024 अत्यंत अन्यायकारक, लोकशाही विरोधी व मूलभूत नागरिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या अंमलबजावणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैयक्तिक गोपनीयता आणि संविधानाने हमी दिलेली नागरी हक्के गंभीरपणे बाधित होण्याची भीती आहे. हे विधेयक लोकशाही मूल्यांना धरून नाही. त्यामुळे जनतेच्या भावना व लोकशाही मूल्यांचा विचार करता “ हा काळा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावे या मागणीला घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पक्षाचा वतीने आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात तहसील समोर निषेध तथा भव्य निदर्शन करण्यात आले. UBT aggressive on Public Security Bill

यावेळी जनसमुदायाला संबोधित करताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, या विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर नागरी हक्क धोक्यात येणार आहेत. विशेषतः आदिवासीबहुल, मागास व संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पोलीस नियंत्रणाच्या नावाखाली सामान्य नागरिक,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते व विरोधी मतधारक यांना अन्यायकारक कारवायांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे हा कायदा राबविण्याऐवजी तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी केली.
यावेळी किरणताई देरकर, उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास, सुधीर थेरे, रवी बोडेकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, संतोष कुचनकर, विनोद दुमणे, दिलीप काकडे, संभा मत्ते, संजय देठे, अजय चन्ने, मनीष बत्रा, साबिर शेख, स्वप्निल ताजने, राहुल कोलते, राजु गोलाईत, प्रकाश कराड, राजू पारोधी, सुरेखा ढेंगळे, सविता आवारी, सीमा बालगोणी, वैशाली देठे, मीनाक्षी मोहिते, गीता उपरे आदी मान्यवर उपस्थित होते.

