Ajay Kandewar,Wani:- गावातील वॉर्ड क्र.4 ची नाली सफाईकडे तसेच जलवाहिनी फुटलेल्या अवस्थेत असून सर्व घाण त्या जलवाहिन्यात मिश्रित होत आहे व घाणीचे साम्राज्य पसरत आहे.असे असूनही राजूर ग्रामपंचायतीचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गावातील नाल्यांची साफसफाई करण्याकरिता ” हातात फावडे” घेऊन ग्रामपंचायतने नाल्या सफाईकडे लक्ष द्यावे व फुटलेल्या दोन जलवाहिनी तात्काळ बदलावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

राजूर ह्या गावची मिनी इंडिया म्हणून विशेष ओळख आहे. इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक वसलेले आहे आणि वेकोली क्षेत्राचा प्रभाव ही आहे.यातच ग्रा. पं राजूर प्रशासन आणि वेकोली प्रशासन असे दोन कारभारी आहेत. या दोन प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे “गावकऱ्यांचे हाल व अनेक वर्षांपासून गाव विकास शून्य “झाले आहे. तसेच गावातील वॉर्ड क्र.4 भाग वेकोली अंतर्गत येत असल्यानं येथील नागरीकांना सोयी सुविधा पुरविण्यात दोन्हीं प्रशासन अनेक वर्षापासून सपेशल फेल होत आहे. आता तर अक्षरशः गावकऱ्यांना नालीचे पाणी प्यावे लागत आहे. या वॉर्डातील जलवाहिन्या फुटून आहे आणि नाली तुडुंब भरलेल्या अवस्थेत आहे. याचे मुख्य कारण असे की “राजूर सचिव साहेब खुर्चीवर मस्त कारभार हाकत आहे आणि सरपंच यांचे दुर्लक्ष होत आहे. अनेकदा सरपंच व सचिव यांना सांगूनही वार्ड क्र.4 ला सचिव,सरपंच व सदस्यानीं वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र दिसत आहे. मग सांगा हो सदस्य सरपंच साहेब, दर पाच वर्षांनी तुम्हीं (हात पाय जोडून )मते (व्होटिंग) मागता कश्याला हो, असा साहजिक प्रश्न नागरिकांना पडतो. कारण सरपंच,सचिव हेही नाल्याच पाणी पितात का अस देखिल प्रश्न निर्माण होतो. आता तरी सचिव साहेबांनी फुटलेल्या जलवाहिन्या बदलून , तुडुंब भरलेल्या नाल्या “हातात फावडे” घेऊन स्वच्छ करायला लावावे अशी मागणी नारिकांमधून होऊ लागली आहे. अन्यथा गावकरी सचिव व सरपंच साहेबाचा खुर्चीवर “नाल्याची गाळ व अशुद्ध पाणी” आणून ठेवायची तयारी ठेवणार असल्याची तयारी दर्शविली आहे. अशी चर्चाही रंगू लागली आहे.



