Saturday, May 9, 2026
HomeयवतमाळCM साहेब...अक्षभ्य आणि निंदनीय वक्तव्य करणाऱ्या कोकाटें ची हकालपट्टी करा......!

CM साहेब…अक्षभ्य आणि निंदनीय वक्तव्य करणाऱ्या कोकाटें ची हकालपट्टी करा……!

•जिल्हाध्यक्ष निखाडे यांचा नेतृत्त्वात शिवसैनिक आक्रमक, •कोकाटें च्या विरोधात पोस्टरला जोडे मारून व काळे फासून निषेध.

Ajay Kandewar,Wani : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल अक्षभ्य आणि निंदनीय वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्याचा निषेध असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी,अशी मागणी करीत आ.संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात Yavatmal जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांनी माणिकराव कोकाटेचा पोस्टरला काळे फासून निषेध केला.

निवेदनात निखाडे यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या पीक विम्याबाबत बोलताना कोकाटे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. खरे तर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देताना शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रमाणे अत्यल्प नुकसान भरपाई मिळते. काही शेतकऱ्यांना तर ती मिळतच नाही. त्यातही पीक विम्याची रक्कम महाराष्ट्राच्या जनतेच्या कराच्या रकमेतून दिले जाते. मंत्र्यांच्या खिश्यातून दिली जात नाही. त्यामुळे मंत्र्यांनी अहंकारात राहून ते बेताल वक्तव्य करु नये.

हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, पण सरकारने एका रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला, असे वादग्रस्त विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर शेतकरी संघटनांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माणिकराव कोकाटे एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना हे विधान केले. अशा या शेतकरी विरोधी कृषी मंत्रीचा वणी विधानसभेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांनी यांचा तात्काळ राजीनामा घेऊन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी वणी आमदार संजय देरकर मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा नेतृत्वात उबाठा शिवसैनिकांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना वणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देत मागणी केली. यावेळी वणी उबाठा गटाचे शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page