Ajay Kandewar Wani:- महसूल प्रशासनाच्या काही पारंगत झारीतील शुक्राचार्यामुळेचं वणी तालुक्यात वर्धा नदीच्या मोठ्या पात्रातून अवैध वाळू उपसा, वाहतूक अनेक दिवसांपासून सुरु आहे. 1 दिवसांपूर्वी वणी तहसिलदार व पथकांनी धाड टाकली.अवैध उपसा होत असलेल्या ठिकाणीं नदी पात्रातून चोरटी रेती काढण्याण्यासाठी भरगच्च जंगलातील काटेरी झुडूप तोडून बनविलेल्या खाजगी घाटांवरुन अवैध वाळू उपसा, वाहतूक करतांना रंगेहाथ तहसीलदाराने 1 हायवा व 1 मशीन जप्त करुन आपल्या कर्मचाऱ्यांना दाखवून,महसूल प्रशासनातीलच काहीं झारीतील शुक्राचार्यांना जणु काही धडाच शिकवला आहे.
वणी तालुक्यात वर्धा नदी हा वाळू घाट आहे, चांगल्या दर्जाची वाळूइथंचं उपलब्ध आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी सध्या वाळू घाटांचा लिलावचं झालेला नसल्याने या कालावधीत करोडो रुपयांची वाळू अवैध वाळू तस्करांनी प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्यांच्या आर्थिक पाठबळामुळे चोरुन नेली आहे. हे या हजारों ब्रास साठी बनविलेल्या खाजगी रेती घाट वरून दिसत आहे.तरी ही रेती चोरटे म्हणतात,” मेरे सब घर बांधके हैं भाई” आजही स्थिती तशीच आहे. तालुक्यात ठिक ठिकाणी शासकीय, निमशासकीय, खाजगी बांधकाम मोठ्या प्रमाणावर होत सोबत घेऊन पकडून असून, वाळूचे ढीग नजरेत दिसून ही महसूल च्या जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी यांनी नेहमीच दुर्लक्षचं केले, विशेष त्यामुळे वाळू तस्करी होत आहे आणि आज ही सात ते आठ हजार रुपये प्रति ट्रॅक्टर प्रमाणे मिळत आहे आज पर्यंत वणी महसूल तर्फे कठोर कारवाई झाली चं नाही ? काहीं महिन्यां आधी झरी तालुक्यांत जीवघेणा हल्ला चक्क तलाठ्यावर मुजोर रेती माफियानी केला होता. अवैध वाळू तस्करांची मुजोरी, अरेरावी दिवसेंदिवस वाढतच आहे ही प्रशासकीय यंत्रणे साठी बाब आहे. शासकीय गंभीर यंत्रणेपेक्षा अवैध वाळू तस्करांची यंत्रणा प्रभावी असून रेती चोरटे सतत बारीक नजर ठेवून, दिवसभर वणी तहसिल कार्यालयाच्या अवतीभवती डेरा टाकून पहारा देत असतात.वणी तालुक्यात शंभर च्या वर ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा वाहतूक व्यवसायात गुंतलेले आहेत.
“
रविवारी पहाटेचा कारवाईत वणीचे तहसीलदार निखिल धुळधर यांनी धाड टाकली त्या दरम्यान अवैध रेती घाटाचा हा प्रकार उघडकीस आला. नदी पात्रातून हजारो ब्रास रेतीचा उपसा केल्याने नदी पात्रात मोठे मोठे तळे निर्माण झाल्याचे बघून स्वतः तहसीलदार दंग राहिले.तेव्हा अवैध वाळू वाहतूक करणार 1 हायवा व 1 मशीन ऑन स्पॉट पकडून जप्त केले. पण अद्यापही आरोपी तावडीतून बाहेर आहे.असे अनेक रेती चोरटे सक्रिय झाले. पण “एक” तो खदाड अधिकारी कोण ? ज्याच्यामुळे तो “एक रेती चोरटा “ अवैधरीत्या रेती उपसा करुन शासनाचा तिजोरीला करोडोचा चुना लावून “करोडपती “ बनला आहे. ते फक्तं एका खादाड अधिकाऱ्यामुळेच पण तो कोण…. हे शोध घेणे गरजेचे ..अशी शहरात बोंब आहे.”

