Saturday, May 30, 2026
Homeवणीआक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी करा…..

आक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी करा…..

•विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणी

•शालेय शिक्षण मंत्र्याकडे निवेदन सादर

सुरेंद्र इखारे,वणी – यावर्षीची दिवाळी (लक्ष्मीपूजन) दि. २४ आक्टोबरला असल्यामुळे आक्टोबर पेड इन नोहेम्बर २०२२ चे वेतन दिवाळीपूर्वी २० आक्टोबर २०२२ पर्यंत अदा करावे अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे व सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी शालेय शिक्षण मंत्री व प्रधान सचिव यांचेकडे विमाशिसंघाचे लेखी निवेदन पाठविले आहे. निवेदनाची प्रत शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांचेकडे सुद्धा पाठविली आहे.


शासनास पाठविलेल्या निवेदनानुसार यापूर्वी ज्यावेळी सणवार महिन्याच्या शेवटी आले त्यावेळी सणावारापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे आक्टोबर २०२२ चे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे असे विमाशिसंघातर्फे पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
मागणीची तीव्रता लक्षात घेण्याकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विदर्भातील माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यामार्फत शालेय शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांचेकडे निवेदन पाठविणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दि. २८ सप्टेंबर २०२२ ला अमरावती जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कार्यालयावर अधिक्षक मदन मोपारी यांना विमाशिसंघाचे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदन सादर करतेवेळी विमाशिसंघाचे प्रांतीय अध्यक्ष एस.जी. बरडे, जिल्हाध्यक्ष दशरथ रसे, महानगर कार्यवाह अरविंद चौधरी, आशिष डेहनकर, गजानन घुगे आदि विमाशिचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page