•वणी पोलिसांची कारवाई…
अजय कंडेवार,वणी:- पीएसआय प्रविण हिरे, पोलिस शिपाई वसीम यांना गोपनीय माहितीनुसार रात्रीचा दरम्यान गस्त घातली असता तालुक्यातील चिखलगाव येथिल महादेव नगरीतून त्यांना एक कार (MH 31 DC 4775) संशयास्पद स्थितीत उभी दिसली. त्यांनी कारमध्ये पाहीले असता त्यांना पांढऱ्या रंगाच्या थैल्या भरलेल्या वस्तुंनी भरलेली दिसली. त्यांनी कार ताब्यात घेऊन पोलीस स्थेशनला आणली व अन्न सुरक्षा अधिकार यांच्या समोर कारची झडती घेतली असता ,कारमध्ये प्रतिबंधित पदार्थांचा साठा सापडलाय. अंदाजे 5 लाख रुपयांचा सुगंधित पदार्थांचा साठा व wagnor कार किंमत 3 लाख 50 हजार रुपये असा एकूण 8 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
प्रतिबंधित पदार्थांचा अवैधरित्या साठा करून त्याची विक्री करण्याकरिता वाहतूक करणाऱ्या अज्ञात आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 नियम नियमने 2011 चे कलम 26(2), 26,30(2)(अ) तथा भादंवि च्या कलम 272, 273, 328, 34नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या आरोपीचा पोलिस शोध घेणे आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप शिरस्कर, प्रविण हिरे( PSI) व वसीम( पो शिपाई )यांनी केली. पुढील तपास प्रवीण हिरे( PSI) करीत आहेत.