•बी.एस. इस्पात कोळसा खाणीतील प्रकार.
देव येवले,झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील बी. एस इस्पात कोलमाइन्स मार्की मांगली एम एम.3 मध्ये २०० कामगार कार्यरत आहे. मात्र कामगारांना कुठल्याच सवलतीचा लाभ दिल्या जात नाही. त्यामुळे कामगारांना कामगार अक्टनुसार सवलती द्या, अशी मागणी एकता असोशियन कामगार संघटनेने तहसीलदारांसह वरिष्ठांकडे केली होती. याबाबत कुठलीही दखल न घेतल्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी येथील कामगार संजय देरकर यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करणार आहे.
बी.एस. इस्पात या कंपनीत एल. बी. कुंजीर या गत वर्षांपासून कंपनीला टेंडर देण्यात आले आहे. कंपनी कामगारांना त्यांच्या सवलती दिल्या जात नाही. ड्रायवर, पीसी आपरेटर, सुपरवायंझर, फिटर व हेल्पर असे २०० कामगार साप्ताहिक सुट्टी ओव्हरटाइम काम करीत आहे. कोळसा खाणीत आरोग्य सेवा व पीएच ही दिल्या जात नाही. त्यामुळे त्या सर्व गत एक वर्षापासून काम करीत असलेल्या कामगारांना या महागाईच्या काळात परिवार चालवणे कठीण झाले.
इस्पात कोळसा खदाणीतील सर्व २०० कामगारांना अॅक्टनुसार सवलती द्या, स्कील नुसार एचपीसी वेजेस लागू करा, कामागारांना अॅक्टप्रमाणे वेतन देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन एकता असोसिएशन शाखा मुकुटबनचे संस्थापक संजय देरकर यांच्या नेतृत्वात अध्यक्ष नेताजी पारखी, उपाध्यक्ष डॉ. नेताजी पारशिवे, सचिव पंढरीनाथ धांडे, अमोल गुनगुनवार, सचिन कडूकर, विष्णूकांत, इरशाद शेख, अमित टोंगे, जाफर शेख, दिलीप गोपतवार, प्रशांत ठमके यांनी दिले. परंतु ७ दिवस लोटूनही संबंधितांकडून कामगारांना सुविधा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पाहून कामगार युनियनचे संस्थापक संजय देरकर यांनी कामगारांकरिता ८ ऑक्टोबरला कामबंद आंदोलन करण्याचा निर्धार केला.