अजय कंडेवार, वणी :- जनता हायस्कूल कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत वणी र.न.103 ची वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन दि.3 आगस्ट 2023 ला स्थनिक जनता विद्यालय वणी येथील कलादालनात संपन्न झाली.60th Annual General Meeting concluded.
सत्र 2022-23 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सभा अध्यक्षस्थानी एम.डि. जोगी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .सभेला पतसंस्थेचे अध्यक्ष पी.व्ही.पोडे उपाध्यक्षा ए.के.जीवतोडे ,सचिव आर.एम.राजुरकर संचालक के.डि. ठेंगने,जे.के.गोरे,जी.एम.काकडे, आर.पी.माटे,पी.पी.देवाळ्कर ,आर.एन.जेणेकर, एस.डि. ताजने उपस्थीत होते .सर्व सभासदांनी वार्षिक सभेमध्ये सहकार वर्ष 2022-23 च्या संस्था सचिवाने सादर केलेल्या अहवालास मान्यता दिली. ठरावामधील सर्व विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सभेचे प्रास्ताविक पी.व्ही.पोडे यांनी केले सचिव आर.एम.राजुरकर यांनी नफा तोटा , जमा खर्च ,व ताळेबंद सादर केले.संचालन शेखर मत्ते व आभार प्रदर्शन जी.एम.काकडे यांनी मानले.