•रेती वाहन सोडण्या प्रकरणी मागितली लाच
•मंडळ अधिकारी, दोन तलाठी, एक पोलीस नाईक.
देव येवले, झरी :- रेतीची रॉयल्टी परत करून वाहने सोडण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह दोन तलाठी व एका पोलिस नाईक असे चौघे एसीबीच्या जाळ्यात अडकले . ही कारवाई झरी येथे करण्यात आली .
या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली . पोलिस नाईक संजय रामचंद्र खांडेकर ( 38 ) , तलाठी नमो सदाशिव शेंडे तलाठी रमेश फकीरा राणे ( 48 ) मंडळ अधिकारी बाबुसिंग किसन राठोड ( 53 ) अशी लाचखोरांची नावे आहेत. लोकसेवकांनी 23 सप्टेंबर 2022 रोजी कायदेशीर कर्तव्य न बजावता आर्थिक लाभासाठी तक्रारदाराच्या वाहनामधील रेतीच्या रॉयल्टी परत करून वाहने सोडण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी तलाठ्याच्या मार्फत 50 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती स्वीकारण्याचे मान्य केले . त्यासाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याचे एसीबी पथकाच्या पडताळणीत स्पष्ट झाले त्यावरून चारही लोकसेवकांविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती .
ही कारवाई पोलिस अधीक्षक मारुती जगताप , अपर पोलिस अधीक्षक अरुण सावंत , अपर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे , पोलिस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर नालट अंमलदार अब्दूल वसीम , सचिन भोयर महेश वाकोडे आदींनी केली .