Tuesday, July 15, 2025
Homeझरी5 सप्टेंबर पासून वणी विधानसभा क्षेत्रात "जनसंवाद पदयात्रा .....!"

5 सप्टेंबर पासून वणी विधानसभा क्षेत्रात “जनसंवाद पदयात्रा …..!”

लोकविरोधी सरकारचा पर्दाफाश करण्यासाठीच जनसंवाद यात्रा .

अजय कंडेवार,वणी:- वणी, मारेगाव व झरी तालुक्यांमध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या अनुषंगाने डॉ. महेंद्र लोढा (समन्वयक जनसंवाद यात्रा, वणी विधानसभा काँग्रेस कमिटी) यांच्या प्रमूख उपस्थितीत ” द वसंत जिनिंग हॉल” येथे दि.2 सप्टेंबर,शनिवार रोजी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.यावेळी जनसंवाद यात्राचे काँग्रेस कमिटीचे वणी विधानसभा समन्वयक डॉ. महेंद्र लोढा यांनी या जनसंवाद यात्रेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील या पत्रकार परिषदेतून केले.”Jansamwad PadaYatra” from 5th September in Wani assembly constituency.

सर्वसामान्यांच्या विरोधातील भाजपाच्या धोरणांमुळे सध्या भाजपविरोधी वातावरण तयार झाले आहे. महागाई, बेरोजगारी याविषयी सर्वसामान्यांमध्ये सरकारविषयी तीव्र नाराजी आहे. काँग्रेस हाच सर्वसामान्यांचा खरा वाली असून जनसंवाद यात्रेतून काँग्रेसची ध्येयधोरणे सर्वसामान्यांना पटवून देण्यात येणार आहेत तसेच महागाई, बेरोजगारी, ढासळती कायदा व सुव्यवस्था यासह विविध मुद्द्यांवर राज्य सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने जनसंवाद यात्रा सुरु केली आहे. यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्ते शहरवासियांच्या तसेच ग्रामीण वासियांचा घरोघरी जाऊन काँग्रेस सरकारच्या कामगिरीची आणि विद्यमान राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची जनतेला जाणीव करून देणार आहेत. भाजप सरकारला जवळपास तीन वर्षे झाली आहेत असे असतानाही महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था अशा विविध प्रश्नांवर कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यांत 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या जनसंवाद यात्रेत कार्यकर्ते शहरातील सर्व खेड्यांपर्यंत जाऊन जनतेशी संवाद साधून राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांची जाणीव करून देणार आहेत. लोकविरोधी सरकारचा पर्दाफाश करण्यासाठीच जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आले आहे असेही या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात असा असेल जनसंवाद यात्रेचे स्वरूप…वेळापत्रक )

1) झरी तालुका 5 सप्टेंबरला यात्रेचा शुभारंभ व सुरूवात होईल.

2) मारेगाव तालुका 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर ही यात्रा सुरू राहील

3) वणी तालुका 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत यात्रा सुरू राहील व 12 सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकित पुतळ्यासमोर राज्यस्तरीय काँग्रेस नेत्यांच्या राज्याचा बड्या नेत्यांच्या उपस्थितीत “भव्य समारोपीय सभा” घेण्यात येईल.

या पत्रकार परिषदेत वंदना आवारी,डॉ. महेंद्र लोढा, राजीव कासावार,आशिष खुलसंगे,घनश्याम पावडे, जयसिंग गोहोकार, संजय खाडे,प्रमोद वासेकर,ओम ठाकुर, राजाभाऊ पाथ्रडकर ,मारोती गौरकार, प्रमोद लोणारे, यासह झरी, मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments