Wednesday, May 20, 2026
HomeBreaking News420 चा आरोपी "झाकणझुल्या" तलाठी रवींद्र उपरे" फरार , "गेंडुरगीटक्या" R.I राजू...

420 चा आरोपी “झाकणझुल्या” तलाठी रवींद्र उपरे” फरार , “गेंडुरगीटक्या” R.I राजू डोंगरे रिटायर्ड……

Ajay Kandewar,Wani:- वणीतील गाजत असलेल्या 420 फसवणूक प्रकरणात शासकीय कर्मचारी असलेले “झाकणझुल्या” तलाठी रवींद्र उपरे आणि  “गेंडुरगीटक्या” R.I. राजू डोंगरे यांच्यासह अन्य 2 आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्याबाहेर असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सामान्य आरोपींवर तातडीने कारवाई करणारी यंत्रणा या प्रकरणात मात्र संथ गतीने काम करत असल्याचा आरोप होत आहे.

विशेष म्हणजे आरोपींकडून अंतरिम जामिनासाठी प्रयत्न सुरू असताना, वणी पोलिसांनी त्यांचे कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि संपर्क साखळी तपासनाची अद्याप ठोस कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागातील दोन शासकीय अधिकारी आरोपी असतानाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे.

कोर्टाचा विषय आहे… कोर्टात जाऊ द्या…” अशीच भूमिका पोलिसांनी घेतली आहे का? असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांची ‘खाकी’ कुठेतरी दागाळलेली दिसत असून, तपासात जाणूनबुजून थंडपणा दाखवला जात असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.दरम्यान, या प्रकरणातील “झाकणझुल्या” तलाठी रवींद्र उपरे, “गेंडुरगीटक्या” R.I राजू डोंगरे आणि अन्य 2 आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती न लागल्याने संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखोंच्या फसवणुकीच्या या प्रकरणात आता वणी ठाणेदार व तपास अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page