अजय कंडेवार-Wani:- चंद्रपूर लोकसभेचा मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा देशातील सर्व एक्झिट पोल झुगारून काँग्रेस अपेक्षेपेक्षा मोठा घेतल्याचे दिसून आले. या परिस्थितीत काँग्रेसची विश्वासार्हता असलेल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा अनेक मतमोजणी फेऱ्या अत्यंत रेकॉर्ड ब्रेक ठरल्याचे दिसून आलें आहे.Pratibhatai Dhanorkar’s “Historical Winner”
यात शेवटी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर रेकॉर्डब्रेक मतांनी विजय झाले तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत पिछाडीवर पडले होते. सध्याच्या आकडेवारीनुसार धानोरकर 2 लाखांचा वर एव्हढ्या मतांनी विजयी झाल्या आहेत. तर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील अधिकृत आकडेवारीनुसार प्रतिभा धानोरकर या सुधीर मुनगंटीवार यांच्यावर प्रथम फेरीपासूनच आघाडीवरच होत्या.
धानोरकर यांनी सकाळपासून प्रत्येक फेरीत आघाडी कायम ठेवली आहे. यावरून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने मुनगंटीवार यांचे सर्व विकासाचे दावे पूर्णपणे खोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. तर धानोरकर विक्रमी मतांनी विजयी झाले. चंद्रपूर- वणी – आर्णी लोकसभा प्रतिभाताईंचा हातात गेले आहे हे माञ स्पष्ट झाले आहे.शेवटी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट आहे .