30 नोव्हेंबर रोजी मारेगाव येथील कला महाविद्यालयात रोजगार मेळावा…..
• बेरोजगाराना सुवर्णसंधी
नागेश रायपूरे, उपसंपादक,मारेगाव:- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उधोजक मार्गदर्शन केंद्र यवतमाळ व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगांव यांच्या संयुक्त विधमाने 30 नोव्हेंबर रोज बुधवारला येथील कला महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात जवळपास नऊ कंपन्या सहभागी होत असुन थेट मुलाखती द्वारे त्यांना जॉब मिळणार असल्याने बेरोजगाराना ही सुवर्ण संधी आहे. यात बी.ए, बी. कॉम. आणि बी. एस.सी सुरू असलेले किंवा पदवी प्राप्त विद्यार्थी तसेच दहावी, बारावी आणि आय.टी.आय झालेले/ सुरू असलेली विद्यार्थी मुलाखतीसाठी हजर राहावे. सोबत येताना शैक्षणिक कागदपत्रे तसेच बायोडेटा, पासपोर्ट फोटो घेऊन यावे तसेच खालील लिंकद्वारे गुगल फॉर्म भरून उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सामील व्हावे. https://forms.gle/A3Mved7bDDYJk4Fe6
परिसरातील बेरोजगाराना ही सुवर्ण संधी असुन या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगांव चे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे तसेच आयोजक प्रा डॉ. श्रीराम खाडे, प्रा. डॉ. दिनेश गुंडावार ,प्रा.डॉ. एन.आर. पवार ,प्रा. डॉ. संतोष गायकवाड ,प्रा. डॉ. विभा घोडखांदे ,प्रा. डॉ. माधुरी ताणुरकर ,प्रा. विजय भगत,प्रा. रुपेश वांढरे, प्रा.प्रदीप माकडे, प्रा. स्नेहल भांदक्कर यांनी केले आहे.