•विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केला सत्कार
अजय कंडेवार,वणी :- सध्या संपूर्ण भारत राममय झाले आहे. ५०० वर्षानंतर अयोध्येत रामाचे मंदिर उभे होवून रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली आहे. आपल्या रामाला डोळा भरून बघण्यासाठी व दर्शन घेवून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येला जात आहे. असिफाबाद येथील असाच एक तरुण चक्क सायकलने प्रवास करीत अयोध्येला निघाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, एकवीस वर्षीय तरुण सचिन आत्राम हा आसिफाबाद येथून आज (दि.२३) ला सकाळी ४ वाजता अयोध्या येथील श्री. राम जन्म भूमी मंदिरात रामलल्लाचे दर्शन घ्यायला निघाला आहे. तो आज दुपारी एक वाजता स्थानिक सिव्हील लाईन चौकात पोहोचला. तिथे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी सचिनचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार केला. त्याला प्रवासात उपयोगी पडेल अशी आवश्यक औषधी घेवून दिली व पुढील प्रवासाकरीता आशीर्वाद दिला. साधारणतः पुढील २५ दिवस अयोध्येत पोहोचायला लागेल असे सचिन आत्राम यांनी सांगितले.
या प्रसंगी जॉनी अडुर, राहुल अगडे, कपिल ढोक, समिर दाचेवार, संजय सपाटे, नितीन कुकडे, डॉ. आशीष महातळे, रविकांत वरारकर, रवि जोगी, राहुल देशमुख, जितेंद्र केराम, संदीप माशीरकर, सुनील मुसळे, आदी उपस्थित होते