अजय कंडेवार,Wani :- येणार येणार म्हणून ज्याची चातकासारखी वाट बघणे सुरू होते ,तो मान्सून अखेर रविवारी एक तास बरसला. गेल्याकाही महिन्यापासून उकाड्याने त्रस्त असणाऱ्या वणीकरांना दिलासा मिळाला.Finally ,it rained heavily in wani
7 जून पासून मान्सून पावसाची प्रतीक्षा सुरू होती. कारण केरळमध्ये ३१ मे, तसेच दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मान्सून प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता.मात्र विदर्भात दाखल झाला खरा, पण बरसला मात्र नाही. उलट उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत गेली. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला तर शहरात उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले. त्यामुळे रोज पावसाची वाट बघणे सुरू होते. आज येणार, उद्या बरसणार अशी प्रतीक्षा सुरू होती. मात्र हवामान खात्याचे अंदाज त्याला दुजोरा देणारे नव्हते. रविवारी पावसाने हजेरी लावल्यावर आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बरसलेल्या धारांमुळे वणीकर सुखावले.
दुपारपर्यंत कडाक्याचे ऊन असताना नंतर वातावरणात बदल होत गेला. दुपारनंतर शहराच्या काही ग्रामीण भागात हलक्या सरीही आल्या. पण त्यामुळे फक्त रस्तेच ओले झाले. मात्र सायंकाळी 5 वाजता पावसाने दमदार हजेरी लावली व जवळपास 1 तास पाणी बरसला. त्यामुळे वातावरणातील उकाडा दूर झाला.हवामान खात्याने पुढच्या २४ तासातही पावसाची शक्यता वर्तविली आहे.