● शेवटीअवैध कोळसा सायडिंग व कोलडेपो वर जप्तीची कार्यवाही करण्याचा ठराव मंजूर
अजय कंडेवार,वणी :- स्वातंत्र्य दिन व महात्मा गांधी जयंती ला विसर पडलेल्या ग्रापं ने दि. 14 ऑक्टो 22 ला ग्रामसभेचे आयोजन केले होते. या ग्रामसभेत अनेक विषयांवर चर्चा झाली. अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या व शेवटी येथील अवैध कोळसा सायडिंग व कोल डेपो वर जप्तीची कार्यवाही करण्याचे व अन्य विषयावर ठराव घेण्यात आले. ही ग्रामसभा सरपंच विद्या पेरकावार यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती.
सर्वप्रथम ग्रापं ने आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती देऊन त्यावर आढावा घेण्यात आला. ग्रापं ने मंजूर केलेले 982 मंजूर घरकुल यादीचे वाचन करण्यात आले. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून इजारा येथील बंद असलेल्या आरो फिल्टर प्लांट च्या दुरुस्ती वर , तसेच नाल्या सफाई, वॉर्ड क्र. 1 कडे गेल्या वीस महिन्यापासून होत असलेले दुर्लक्ष आणि बंद पडलेल्या जुन्या हिंदी शाळेला बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर केल्या गेलेल्या 10 लक्ष रुपये खर्चाचा मुद्यांवर प्रचंड खडाजंगी झाली. सर्वच प्रश्नांवर ग्रामसेवक चहानकर यांनी उत्तर दिले.
गावकऱ्यांनी मांडलेल्या अनेक विषयांवर ठराव घेण्यात आले. शेवटी राजूर येथे उभारण्यात आलेल्या अवैध कोळसा सायडिंग व कोल डेपो संदर्भात प्रचंड गरमागरम चर्चा झाली. येथील राजूर बचाव संघर्ष समिती व राजूर ग्रापं ने आतापर्यंत ह्या विषयावर केल्या गेलेला पाठपुरावा व आंदोलनानंतर आणि दि 17 ऑक्टो 22 पासून होत असलेल्या बेमुदत आमरण उपोषण संदर्भात वणी उपविभागीय कार्यालय द्वारे प्राप्त झालेल्या पत्रावर चर्चा झाली. ग्रापं ने आतापर्यंत ह्या अवैध सायडिंग व कोल डेपोला दोन वेळा नोटीसा देण्यात आल्यावरही हे बंद करण्यात न आल्याने आता जप्ती कार्यवाही करण्याचा ठराव घेण्यात आला व फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे ठरविण्यात आले आहे. ह्याच ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी राजूर बचाव संघर्ष समिती द्वारा करण्यात येत असलेल्या दि. 17 ऑक्टो 22 पासूनच्या बेमुदत आमरण उपोषणात मोठ्या संख्येत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
ह्या ग्रामसभेला मो. असलम, डेव्हिड पेरकावार, कुमार मोहरमपुरी, राहुल कुंभारे, सरोज मून, जयंत कोयरे, रियाजुल हसन, नितीन मिलमिले, ओम चिमुरकर, महेंद्र वाळके, अमृत फुलझेले, महादेव तेडेवार, दिनेश बलकी, मारोती कोंडागुर्ले, गोवर्धन दुर्योधन, उत्तम धोटे, मोसीम खान, अरबाज खान,इरफान शेख, दिशा फुलझेले, सौ. तितरे, सौ. बहादे, कपिल मेश्राम, सत्तू उईके, अभिषेक अंडेल,ग्रापं सदस्य सौ. देवतळेबाई, सौ. डवरे, सौ. सिडाम, ग्रापं कर्मचारी जगदीश दारूंडे, निखिल उरकुंडे, मंडळ अधिकारी डांगाले, कोतवाल गजानन खैरे व अनेक स्त्री पुरुष व अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी उपस्थित होते.