Tuesday, October 14, 2025
HomeBreakingसावधान.... श्री रंगनाथस्वामी पतसंस्थेला" बदनाम करण्याचे राजकिय डाव.....!

सावधान…. श्री रंगनाथस्वामी पतसंस्थेला” बदनाम करण्याचे राजकिय डाव…..!

•तक्रारदाराचा आरोपाचे पतसंस्थेनें केले खंडन. •तो तक्रारदार(बदनाम करणारा) स्वतःच आर्थिक अपहार प्रकरणात दोषी. •संस्था "अ"वर्ग ऑडिट,नामांकीत पुरस्कार प्राप्त. •"हा तक्रारदार" बदनाम का करत आहे वाचाच तुम्ही एकदा.....

Ajay Kandewar,Wani:- सन २०२२ चे संस्थेचे निवडणुकीनंतर संस्थेच्या विरोधात अनेक तक्रारी व खोट्या अफवाह करून संस्थेला व संचालक मंडळाला बदनाम करण्याचे प्रयत्न काहीजणांकडुन सतत करण्यात येत आहे. मागील काहीं दिवसांपासून श्री. रंगनाथ स्वामी पतसंस्थेला बदनाम करण्याचे डाव आणखी आखले आहे. त्यामुळं श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेने त्या बिनबुडाचा आरोपाचे “सार्वजनिक पत्र” काढून खंडन केले.त्यात या ” तक्रारीचे कारण व तक्रारदार याबाबतची माहीती ” संस्थेने जनसामान्यांपर्यंत दिली आहे .एकदा सर्वांनी नक्किच पुर्ण प्रकार वाचाच..…….

श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणी र.नं. ११४२ ही संस्था मागिल ३५ वर्षापासुन सुरळीत सुरू आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्र राज्य असुन संस्थेच्या यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली व वर्धा या चार जिल्हयात मुख्यकार्यालयाला धरून एकुण २२ शाखा आहेत. संस्थेचे सभासद ८७०७५, ठेवी ८२४ कोटी १९ लाख आहे. ऑडीट वर्ग “अ” दरवर्षी संस्थेस मिळालेला आहे. संस्थेचा प्रगतीशिल आर्थिक व्यवहार व उत्तम कामगिरी बद्दल दखल घेऊन संस्थेला सहकार क्षेत्रातील अनेक नामांकीत पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

संस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांनी संस्थेच्या शाखांची अंतर्गत तपासणी करण्याचे आदेश आक्टोबर २०२० मध्ये दिले. या अंतर्गत तपासणीत वणी , घाटंजी, राजुरा व गडचांदुर या शाखेत कार्यरत “काही कर्मचाऱ्यांनी” तर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आढळल्याने त्यांची संचालक मंडळाने चौकशी केली आणि दोषीं कर्मचाऱ्यांना संस्थेच्या कामावरून कमी केले. वणी शाखेत अपहार रक्कमेची पुर्ण वसुली केली. संस्थेत गैरव्यवहार करणाऱ्यांचे विरूद्ध पोलीस तक्रारी केल्या. यापैकी राजुरा व गडचांदुर या शाखेत गुन्हा नोंद झाला आहे. यामुळे हे अपहार करणारे कर्मचारी बडतर्फ केल्याचा राग मनात धरून संचालक मंडळावर खोटे आरोप करत आहे. यापुर्वी अमोल पुरूषोत्तम नावडे व इतर यांनी केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने मा. सहकार आयुक्त यांचे आदेशाने चाचणी लेखापरीक्षण सुरू आहे त्याचा अहवाल संबंधित लेखापरिक्षकाने अजुन पर्यत विभागास सादर केलेला नाही. त्यांनी चाचणी लेखापरीक्षण पुर्ण करून अहवाल लवकर सादर करावा अशी संस्थेची मागणी आहे.

अमोल नावडे संस्थेच्या सेवेतुन कायमस्वरूपी  (डीसमिस)….

चाचणी लेखापरीक्षण अहवाल लवकर व्हावा,यासाठी रिट पिटीशन दाखल करणारा अमोल पुरूषोत्तम नावडे हा संस्थेचे वणी मुख्यशाखेत २०११ पासुन दिनांक २८/०१/२०२२ पर्यंत लिपीक या जबाबदारीच्या पदावर कायम सेवक म्हणुन कार्यरत होता. त्याने व इतर तिन कर्मचाऱ्यांनी संगनमताने वणी शाखेत मार्च २०१५ ते आक्टोंबर २०२० या कालावधीत आर्थिक अपहार केल्याचे शाखेच्या अंतर्गत तपासणीत आढळुन आले. संस्थेने ठराव घेवुन दि. २८/०१/२०२२ रोजी अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेतुन निलंबित केले. संस्थेने चौकशी अधिकारी नेमुन अपहार करणाऱ्यांची खाते चौकशी केली. अपहार करणाऱ्यांनी अपहार केलेल्या रकमा संस्थेत जमा केल्या. अमोल पुरूषोत्तम नावडे (तक्रारदार) याने एकटयाने या अपहार रकमेचा व्याजासह एकुण भरणा रू. ४६,९१,८२१/-संस्थेत करून दिला. संस्थेने अमोल नावडे व इतर ३ यांना दि. १९/०४/२०२२ रोजी संस्थेच्या सेवेतुन कायमस्वरूपी कमी (डीसमिस) करण्यात आले.

 

फॉरेंन्सीक ऑडीटचा अहवाल प्राप्त….

फॉरेंन्सीक ऑडीटचा अहवाल संस्थेस प्राप्त झाल्यावर संचालक मंडळाने वणी शाखेत अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विरूद्ध पोलीस स्टेशन वणी येथे दि. २३/०८/२०२४ रोजी फौजदारी तक्रार दाखल केली. संबंधित तक्रारीची चौकशी वणी पोलीस स्टेशन मार्फत सुरू असुन अजुन पर्यत गुन्हा नोंद झाला नाही. अमोल नावडे व इतर यांचेविरूद्ध संस्थेने केलेला केळापुर न्यायालयात विशेष दिवाणी दावा क्र.५७/२०२३ (अब्रुनुकसान दावा) आणि वणी न्यायालयात फौजदारी दावा क्र. ७२७/२०२३ न्यायप्रविष्ट आहे.अमोल नावडे सोबत ज्या तक्रारदारांनी सहकार विभागात तक्रार केली होती त्यापैकी चार जणांनी गैरसमजूतीने तक्रार दाखल केलेली होती व याचा पश्चाताप झाला असे मान्य करुन केलेली तक्रार लेखी स्वरुपात परत घेतली आहे.अमोल नावडे यास संस्थेच्या सेवेतुन कायमचे कमी केल्यामुळे त्याने संस्थेविरूद्ध अनेक तक्रारी केल्या तसेच कामगार न्यायालय, यवतमाळ येथे केस नं. Misc ULP 03/2023 दाखल केली. संबंधित केस न्याय प्रविष्ट आहे. 

 

•२०२३ मध्ये संस्थेविरूद्ध पत्रकारपरीषद घेवुन बदनामिकारक आरोप..

हया सर्व बाबी झाल्यामुळे पुर्वग्रह दुषीत व बदल्याच्या भावनेने संस्थेतील काही बडतर्फ कर्मचारी व एजंट यांचेशी मिळुन जानेवारी २०२३ मध्ये संस्थेविरूद्ध पत्रकारपरीषद घेवुन बदनामिकारक आरोप केले. त्यामुळे संस्थेच्या गुडविलला धक्का पोहचला होता.

 

• श्री. रंगनाथ स्वामी पतसंस्थेनें घेतली सहकार क्षेत्रात गगन भरारी…. 

अफवांना बळी पडुन संस्थेतील ठेवी सभासदांनी परत मागल्या. संस्थेने ठेवी परत मागणाऱ्या ठेवीदारांना त्वरीत ठेव परत केल्या. तक्रार होण्यापुर्वी संस्थेत एकूण रू. ७७२ कोटी ९१लाख एवढया ठेवी होत्या. मात्र या प्रकरणामुळे काही दिवसात रू. १०८ कोटी ३४ लाख ठेवी विड्रॉल झाल्या व ६६४ कोटी ५७ लाख शिल्लक होत्या. मात्र असे असले तरी सभासदांनी संस्थेवर पुनश्चः दाखविलेल्या विश्वासाने संस्थेस ठेवी पुन्हा वेगाने प्राप्त झाल्या आहे. दि. ९/०५/२०२५ रोजी ८२४ कोटी १९ लाख एवढया ठेवी संस्थेमध्ये ठेविदारांनी ठेवल्या आहे. संस्थेचा दैनिक व्यवहार सर्व शाखा मध्ये सुरळीत सुरू आहे. संस्थेचे राजकिय विरोधक व तक्रारदार एकत्र येवून संस्थेचे नुकसान करण्यास टपुन बसले आहे. तरीही या कठीण परीस्थीतीमधुन संस्था नियमितरीत्या आपली प्रगती करत आहे. नियामक मंडळ व मा. सहकार आयुक्त यांचे धोरण व निर्देशाप्रमाणे संस्थेचे कामकाज सुरळीत सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments