Ajay Kandewar, Wani:पिंपळगाव परिसरातील ग्रामस्थांचा दीर्घकाळाचा संताप अखेर फुटला आणि गुरुवारी जुनाड फाटा येथे झालेल्या “रस्ता रोको” आंदोलनाने वेकोली प्रशासनाला जागं केलं. सरपंच दीपक मत्ते यांच्या ठाम नेतृत्वाखाली ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत आपल्या हक्कांसाठी लढा दिला. अखेर वेकोली प्रशासनाला झुकावं लागलं आणि सर्व सातही मागण्या लेखी स्वरूपात मंजूर करण्यात आल्या.
पिंपळगाव, उकणी, बोरगांव, जुनाड, निळापुर ब्राम्हणी, कोलार, पिपरी या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून खाणीसाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांवर बेजबाबदारपणे अन्याय करीत आहेत तसेच धूळ, प्रदूषण, नादुरुस्त रस्ते, डम्पिंगचा धोका आणि आरोग्य समस्यांकडे वेकोली प्रशासन दुर्लक्ष करत होतं. यावर वारंवार निवेदनं, पत्रव्यवहार झाले, पण प्रतिसाद नव्हता. अखेर ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या या तीव्र आंदोलनाने वेकोली प्रशासनाची झोप मोडली. दीपक मत्ते यांचा निर्धार होता की, या मातीत न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.ग्रामस्थांचा आवाज आता प्रशासनाला ऐकावा लागेल. यावर आक्रमक स्वरूपाची भूमिकेपुढे वेकोली प्रशासनाला नमत घ्याव लागल.या यशानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दीपक मत्ते यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा आमचा आवाज प्रत्यक्ष ऐकला गेला,वेकोली प्रशासनाने वर्षानुवर्षे टाळलेले प्रश्न अखेर ग्रामस्थांच्या एकतेपुढे नतमस्तक झाले. दीपक मत्ते यांच्या धाडसी नेतृत्वामुळे “रस्ता रोको” आंदोलन यशस्वी ठरलं आणि वेकोली प्रशासनाने लेखी आश्वासन देत दीपक मत्ते यांनी विश्वास परत जिंकला.
•वेकोली प्रशासनाने लेखी स्वरुपात मान्य केल्या सर्वच मागण्या…..
आंदोलनादरम्यान वेकोली प्रशासनाने तातडीने प्रतिसाद देत ग्रामस्थांसमोर सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या.त्यात —प्रदूषण नियंत्रणासाठी तातडीची पावले,धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी,रस्त्यांचे डांबरीकरण, सुरक्षित डम्पिंग झोन,आरोग्य शिबिरांचे आयोजन,ग्रामसभेच्या माध्यमातून नियमित संवाद,उर्वरित जमीन संपादनासंबंधी निर्णय या सर्व अटींचा समावेश आहे.