Tuesday, December 23, 2025
HomeBreaking Newsसपेशल Fail तलाठी,मंडळाधिकारी यांचे निलंबन कधी...?

सपेशल Fail तलाठी,मंडळाधिकारी यांचे निलंबन कधी…?

•स्पॉट धाड..... सगळ उघड... तरी कारवाई शून्य. •तो "एक खादाड" म्हणे मैं हुं ना....? मिळेल का हो"तो खादाड "?

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यांतील वर्धा नदीपात्रातील झोला घाट अवैधरीत्या पोखरली आणि तेथील तलाठी, मंडळाधिकारी यांना कस काय माहित नाही जेव्हां शेवटी तहसिलदार यांनी धाडस दाखवित मध्यरात्री धाड घातली तर स्पॉट वर एक मशीन आणि एक हायव्हा जप्तीची कारवाई केली यातून झोला घाटात हजारों ब्रास वाळू चोरी रोखण्यात अपयश आलेल्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाईची टांगती तलवार असतानाही वणी महसूल विभागातून 9 दिवस लोटूनही अक्षरशः तलाठी व मंडळ अधिकारी यावर कुणाचा आशिर्वाद म्हणावं लागेल.अशी खमंग चर्चा रंगू लागली आहे.

अवैध वाळू उपसाप्रकरणात तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना याची कल्पना नसते काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाळू तस्करीला मंडळाधिकारी व तलाठ्यांचे पाठबळ असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाईची शक्यता होती पण अस काही प्रशासनानं केलें नाहीं आणि त्यांना अस कस माहिती नव्हत की,शासनाची हाजारो ब्रास रेती चोरी जाते आणि या अधिकाऱ्यांना कानो कान खबर नसणे म्हणजे प्रशासन मूंग गिळून असल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होते. यावर वणी तहसिलदार यांनी जातीने लक्ष घालून या सपेशल Fail तलाठी,मंडळाधिकारी यांचावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे तेव्हाच अन्य कर्मचारी यांना भिती निर्माण होईल. असे न झाल्यास “ इनके भी पुरे हाथ खून से रंगे हैं…”असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही का? अशीही शहरात चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments