Ajay kandewar,Wani : समाजकारण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जपणाऱ्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी यांनी पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श घालून दिला आहे. अलीकडील पूरपरिस्थितीत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
या अनुषंगाने संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) संजय दोरखंडे आणि शाखा व्यवस्थापक प्रविण नांदे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठीचा धनादेश सहायक निबंधक सचिनकुमार कुळमेथे यांना सन्मानपूर्वक प्रदान केला.संस्थेच्या या उपक्रमाचे शहरात आणि बँकिंग क्षेत्रात कौतुकाचे सूर उमटले आहेत.समाजहितासाठी नेहमी पुढाकार घेणारी ही पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता, समाजाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचे कार्य करत असल्याचे बोलले जाते.पूरग्रस्तांना मदतीचा हा हात देत श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वणी यांनी केवळ सामाजिक जबाबदारी पार पाडली नाही, तर सहकार चळवळीतील मानवी मूल्यांचा आदर्शही प्रस्थापित केला आहे..
संजय दोरखंडे यांनी यावेळी सांगितले की,
“पूरग्रस्त नागरिकांचे दु:ख हे संपूर्ण समाजाचे दु:ख आहे. आपल्या थोड्याशा सहकार्याने त्यांच्या आयुष्यात नव्याने आशेचा किरण उजळेल, अशी आमची भावना आहे.”
शाखा व्यवस्थापक प्रविण नांदे….
शाखा व्यवस्थापक प्रविण नांदे यांनीही संस्थेच्या सर्व सभासदांचे आभार मानत सांगितले की,ही देणगी ही संस्थेच्या प्रत्येक सभासदाच्या संवेदनशीलतेचे प्रतीक आहे. समाजासाठी कार्य करणे हेच आमचे ध्येय आहे.”