Tuesday, October 14, 2025
Homeराजकारणवनहक्क शेतकऱ्यांचे वारस नोंदणी,फार्मर आयडी व स्वतंत्र सातबारा अद्यापही प्रलंबित.

वनहक्क शेतकऱ्यांचे वारस नोंदणी,फार्मर आयडी व स्वतंत्र सातबारा अद्यापही प्रलंबित.

• जिल्हाधिकाऱ्यांकडे उपसरपंच सचिन रासेकर यांनी प्रश्न रेटून धरला.

Ajay Kandewar,Wani : तालुक्यातील मौजा मोहदा, पिंपरी (का) व डोर्ली (ता. वणी, जि. यवतमाळ) येथील वनहक्क पट्टाधारक शेतकऱ्यांना वारस नोंदणी,फार्मर आयडी निर्मिती व सातबारा विभाजन या तिन्ही प्रमुख अडचणींमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. या तिन्ही गंभीर प्रश्‍नांबाबत मोहदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन रासेकर यांनी (ता.६.ऑक्टो) रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सविस्तर निवेदन सादर करीत चर्चाही करण्यात केली.

जिल्हास्तरीय वनहक्क समिती यवतमाळ यांच्या आदेशान्वये पिंपरी (का) येथील वनहक्क गट क्र. २२४ मधील मोहदा, पिंपरी व डोर्ली येथील एकूण २६ अनु. जमाती पारंपरिक निवासी शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मंजूर करण्यात आले परंतु, या २६ शेतकऱ्यांपैकी ६ शेतकरी मय्यत झाले असून, त्यांच्या वारसांची नोंद सातबाऱ्यावर अद्यापही झालेली नाही. सामुहिक सातबाऱ्यामुळे ही प्रक्रिया अडकली असून, त्यामुळे मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही.दुसरीकडे,सामुहिक सातबाऱ्यामुळे वनहक्क शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्यात अडचणी येत आहेत. शासनाने राबविलेल्या पीक विमा योजना,पी.एम.किसान सन्मान निधी योजना,महाडीबीटीवरील विविध शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक आहे. मात्र सामुहिक सातबारा असल्याने मोहदा, पिंपरी, डोर्ली येथील शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, कीड, पिकांचे रोग व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही.

तसेच,या वनहक्क गट क्र. २२४ मधील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा सामुहिक असल्याने स्वतंत्र सातबारा विभाजन होणे आवश्यक आहे. स्वतंत्र सातबारा मिळाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील हक्क स्पष्ट होतील आणि शासकीय योजना, कर्ज व पीकविमा आदी लाभ सहज उपलब्ध होतील.म्हणून उपसरपंच सचिन रासेकर यांनी वनहक्क पट्टाधारक शेतकऱ्यांचा प्रश्न रेटून धरीत जिल्हाधिकाऱ्यांकडे या तिन्ही मागण्यांबाबत (१) मय्यत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करणे, (२) फार्मर आयडी मिळविण्यावरील अडचण दूर करणे, आणि (३) वनहक्क शेतकऱ्यांचे सातबारे वेगळे करणे — या तातडीच्या मागण्या मांडल्या केल्या असून, त्वरित कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे.या निवेदनामुळे वनहक्क पट्टाधारक शेतकऱ्यांचा दीर्घकालीन प्रश्न सुटण्यास मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.यावेळी ग्रा.पं.मोहदा उपसरपंच सचिन रासेकर,भगवान कुमरे, नंदू मेश्राम, बाबाराव सोयाम, निलकंठ उईके ,अनिल आडे, विठ्ठल गोविंदा सिडाम, नामदेव सोयाम व सुभाष कुळमेथे उपस्थित होते.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments