Tuesday, March 3, 2026
Homeवणीवणी वाहतूक शाखेनी कंबर कसली………..

वणी वाहतूक शाखेनी कंबर कसली………..

•रात्री शहरातून येणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई…

अजय कंडेवार,वणी :- वणी पोलिसाबरोबर आत्ता वाहतूक शाखेनेही कंबर कसली आहे. शहरातून येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनामुळेच मोठमोठे अपघात व वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम वणी वाहतूक शाखेचे प्रमुख संजय आत्राम यांनी हाती घेतली आहे. त्यात त्यांच्या चमूने वाहतूक नियमांतर्गत दिनांक 13 सप्टेंबरचा रात्री पाच जड वाहतूक व चालकांवर वाहतूक नियमांतर्गत कडक कारवाई केली आहे.

यामध्ये अन्य महामार्गावरील बेकायदेशीर पार्किंग हटविण्याची मोहीम हाती घेतल्याने तालुक्यातील महामार्ग मोकळे होऊ लागले आहेत वणी शहरातील टिळक चौक हा सर्वात जास्त वाहतुकीच्या रहदारीचा मार्ग असून,या मार्गावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे दुचाकी असो की चारचाकी पार्किंग करीत असल्याने नियमित वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब प्रमुखानी लक्षात घेतली व त्यावर कारवाईचा बडगा करण्याचा निर्धार केला असता काल रात्री ह्या मोहिमेला सुरूवात करताच दिवस निघेपर्यंत कारवाईचा बडगा सुरूच होता.
दरम्यान शहरात जड वाहतूक करणार्‍या अवजड वाहनांवर काल रात्री वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाईचा उगारा केल्याचे आज ठाण्यात दिसुन आले. त्यात पाच ट्रकांचा MH40-CD-8693,MH34-BG-1732,MH40-BL-6245,MH34-BG-3296,MH40-CD-7814 या
या पाचही जड वाहतूक वाहनावर व चालकांवर करवाई करीत त्यावर वाहतूक नियमांतर्गत दंड ठोठावण्यात आला. वाहतूक शाखेने कौतुकास्पद कार्य केलेच त्यात माञ शंका नाही.या शिवाय तालुक्यातील सर्वच गोदामात ट्रक पार्किंगच्या जागेवर भाड्याच्या लालसेपोटी ट्रक ठेवले जात आहेत.त्यामुळे अशा पार्किंगच्या ठिकाणी गोदामात कंटेनर ठेवणार्‍या गोदामांवरही कठोर कारवाईची मोहीम हाती घेण्याची गरज आहे.आता रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या अवजड वाहनांवर कायदेशीर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.ते कितपत कार्य करेल ? याकडेही सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

सदरची कारवाई वणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांचा मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सपोनी संजय आत्राम, सुमित गौरकार, सचिन नैताम, गोपाल हेपट, प्रदीप भानारकर, प्रकाश मेश्राम यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page