Monday, December 22, 2025
Homeक्राईमवणी ठाण्यात चाललंय तरी काय….???

वणी ठाण्यात चाललंय तरी काय….???

•धाडी बाहेरच्या बाहेर..चिरीमिरीत……..

•जवळपास अनेक अधिकारी आणि वसुलीबाज अग्रस्थानी…

•पोलिस स्टेशनचा हाकेचा अंतरावर अवैध धंदे सोडून आणि मिलीभगत कर्मचाऱ्यांची काही कि.मी अंतरावर चिरीमिरीसाठी गरीबांना त्रास वाह रे न्याय…!

अजय कंडेवार,वणी:- गेल्या दोन एक वर्षांपासून वणी पोलिसांचा कारभार अगदी चव्हाट्यावर आल्याचे दिसायला लागले आहे. स्वतः न्यायाधीश बनून चिरीमिरीत प्रकरणे दडपण्यात वणी पोलीस सध्यातरी अव्वल आहे. मग हे जनतेचे सेवक की,वसुलीबाज हाच घहाळ प्रश्न आहे. विशेष माहिती ही की, अवघ्या शहरांतील अनेक ठिकाणीं अवैध मटका , सट्टा, जुगार व हाकेच्या अंतरावर झंडीमुंडी सूरू असल्याची खमंग चर्चा आणि अशी विदर्भ न्यूजची बातमी लागताच दुसऱ्या दिवशी कर्मचारी संपुर्ण वणी शहर सोडून तेथील माल मलाई सोडून छोट्याशा गावात जाऊन चिरीमिरी साठी त्रास देणे सूरु केल्याची जनसामान्यातून माहिती मिळाली आहे.

गेल्या कित्येक वर्षात वणी पोलीस सर्व बाबतीत अव्वल होते. ठाणेदार सुभाष अनमूलवार,वाघ ,सुधाकर अंभोरे,डुबल, मुकुंद कुळकर्णी, वैभव जाधव,श्याम सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक वानखेडे,दीपक पवार,निखिल फटींग,संगीता हेलोंडे,जयप्रकाश निर्मल यांच्या नंतर आलेले अनेक अधिकारी चिरीमिरीत दडले असल्याचे चित्र दिसायला लागले आहे. सध्यातरी  धाड टाका आणि वसुली करा असाच फंडा सुरू आहे.. धाडीतील पैसा गायब असे सांगण्यात येथील कर्मचारी अग्रेसर असल्याचे बोलल्या जात आहे.आता काही कर्मचारी वर्गाचे गट तयार करून धाड सत्र राबवित असल्याचे चित्र आहे .त्यातही खुरापतीचे काहीं मासोळ्या फडफड करण्यास शिकल्या असल्याचीही खमंग चर्चा आहे.मागील काळात येथील अनेक अधिकारी यांनी पोस्को असतांना सुद्धा मोठी दिल केली असल्याची खमंग चर्चा रंगत होती. त्यानंतर पोलिसांच्या हातून आरोपी सुद्धा पळून गेला होता. या वरिष्ठ अधिकारी यांचे पाठबळ असल्याने वणी ठाण्यावर वचक नसल्याचे दिसायला लागले आहे. येथील,राजकीय सामाजिक व्यवस्था डळमळीत असल्याने वणी ठाण्यातील काही अधिकारी, कर्मचारी मस्तावले असल्याचे दिसून येत आहे. तसेच चाय से भारी केटली अशी परिस्थिती नुकत्याच दोन जुगार अड्यावर पोलिसांनी धाड टाकली होती.यात एका गुन्ह्यातील आरोपींना मुभा सुद्धा दिली.कारण राजकीय दडपण?मात्र दुसरी धाड झाली यात लाखोंची हेराफेरी केली असल्याची खमंग चर्चा शहरात आहे. आता ठाणे सध्यातरी जनतेच्या सेवेत नाही हे तितकेच खरे आहे. एकूणच वणी ठाणेदार सध्यातरी राजकीय बळ वापरून स्वतः आणि आपल्या दिमतीला असणाऱ्यांचे चांगभलं करीत सामान्य जनतेला वेठीस धरत असल्याच्या कुरबुरी ऐकायला येत आहे. एकूणच वणीत सर्व काही आलबेल असल्याचे वरिष्ठ अधिकारी यांना अहवाल देत येथील अधिकारी मस्तवाल आहेत. सामान्य माणूस न्यायासाठी येतो आणि हे खाकी ची धमकी देत दुरावत असल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे. आणखी काही तोड्या करणे, खाकी वर्दीची धाक दाखविणे, या गंभीर प्रश्नाकडे विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

अनेक मोठ्या गुन्ह्याचा तपास लावण्यात सध्यातरी वणी पोलीस अपयशी ठरले असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.केवळ चिरीमिरी कुठून मिळेल यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे दिसते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments