•”पारसमल प्रेमराज ज्वेलर्सचा” वतीने भव्य बक्षिसांचा वर्षाव.
•वणी विधानसभा क्षेत्राच्या क्रिकेट प्रेमींना सुवर्णसंधी ऍड कुणाल चोरडिया यांचे आवाहन .
सुरेंद्र इखारे, वणी – येथील पारसमल प्रेमराज ज्वेलर्स यांच्या वतीने वणी येथील शासकीय मैदानावर भव्य असे क्रिकेटचे 8 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2022 पर्यंत टी-10 चॅम्पियन लीग क्रिकेट दिवस-रात्र (Day -Night)खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.

वणी विधानसभा क्षेत्रातील क्रिकेट प्रेमींना सुवर्ण संधी वणीत होणाऱ्या टी-10 चॅम्पियन्स लीग क्रिकेट खेळात प्रवेश घेऊन वणीच्या इतिहासात प्रथमच नाव नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या क्रिकेट प्रेमींना पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बक्षिसांची संधी प्राप्त होत आहे. प्रथम बक्षीस पाच लाख, द्वितीय बक्षीस दोन लाख 50 हजार ,तृतीय बक्षीस एक लाख तर चतुर्थ बक्षीस 51 हजार रुपये आहे. तसेच वैयक्तिक खेळ दाखविणाऱ्या खेळाडूंना बक्षिसांची सौगाद आहे. या क्रिकेटच्या खेळाची वणीच्या इतिहासामध्ये टी-10 या चॅम्पियन्स लीगच्या माध्यमातून नोंद होणार आहे. टी- 10 चॅम्पियन्स लीग मध्ये प्रवेश घेण्यासाठी

खालील मोबाईल नंबरवर 8412812626 उमेश पोद्दार, 7020475050 मनीष गायकवाड, 9922161616 राकेश खुराणा, 9518753059 पियुष चव्हाण, 8983200985 संदीप बेसरकर, 9284881655 राजू रिंगोले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ऍड कुणाल विजय चोरडिया व समस्त चोरडिया परिवार यांनी केले आहे.


