Monday, December 22, 2025
HomeBreaking"रवी " नेहमी म्हणे...“माझा विठ्ठल आहे, संजय देरकर......

“रवी ” नेहमी म्हणे…“माझा विठ्ठल आहे, संजय देरकर……

Ajay Kandewar,Wani :- शहरातील क्राइम रिपोर्टिंगसाठी निर्भीडपणे ओळखले जाणारे पत्रकार रवी ढुमणे यांच्या आत्महत्येने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. ता. १५ सोमवारी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर आता प्रकरणाला नवे, खळबळजनक वळण मिळाले असून व्हॉट्सॲपवरील एका संदेशासह डायरीत आढळलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये “त्या विक्की सेठ”चा थेट उल्लेख असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. फसवणुकीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे त्या लिखाणातून स्पष्ट होत असल्याचा दावा केला जात असल्याने, या प्रकरणात सत्य काय आणि न्याय कसा मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

या सगळ्यात सर्वात भावनिक आणि संवेदनशील धागा म्हणजे रवी ढुमणे आणि वणी विधानसभेचे आमदार संजय दरेकर यांचे नाते. रवी आपल्या खासगी आणि पत्रकार मित्रांच्या गप्पांमध्ये आमदार संजय दरेकर यांना “माझा विठ्ठल” असे संबोधत असे. संकट आले की तो ठामपणे म्हणायचा— “माझा विठ्ठल आहे, संजय दरेकर.” आज रवी गेला, पण त्याने जपलेली ही श्रद्धा, हा विश्वास… तो आता पूर्णत्वास जाणार का, हा प्रश्न वणीतील प्रत्येक संवेदनशील मनाला छळत आहे.

कथित सुसाईड नोटमधील गंभीर उल्लेखांनंतर पोलिस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणारच आहे; मात्र या संपूर्ण प्रकरणात आमदार संजय देरकर काय भूमिका घेतात, हे तितकेच निर्णायक ठरणार आहे. रवीने ज्यांना विठ्ठल मानले, ते विठ्ठल आज रोजी त्याच्या कुटुंबासाठी धावून येणार का? मृत पत्रकाराच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आमदार या प्रकरणात थेट उडी मारणार का? की हे प्रकरणही वेळेच्या ओघात शांत होणार? आज वणी केवळ एका आत्महत्येने हादरलेली नाही, तर एका विश्वासाच्या कसोटीवर उभी आहे. रवी ढुमणे यांच्या नावाशी जोडलेला हा न्यायाचा लढा आता कुठल्या दिशेने जाणार, याकडे संपूर्ण शहराचे, पत्रकार बांधवांचे आणि सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. रवीसाठीचा तो “विठ्ठल”(आमदार संजय देरकर) खरोखरच धावतो का, याचे उत्तर लवकरच समोर येणार आहे. नाहीतर राजकारणात एक म्हण आहे ,काम झालं माझं का करत तुझं अशी व्यथा  रवीची होणार नाही ना? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments