Ajay Kandewar,Wani:- शिवसेना (शिंदे गट) कडून संघटन मजबूत करण्याच्या दिशेने पुन्हा एक महत्वाची चाल खेळण्यात आली आहे. वणी विधानसभा युवा सेना प्रमुखपदी युवराज ठाकरे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली असून, या निर्णयाचे वणी तालुका व जिल्हाभरातून स्वागत केले जात आहे.
ता.5. ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्यात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष उपस्थितीत तसेच शिंदेसेना यवतमाळ- आर्णी समन्वयक माजी आमदार विश्वास नांदेकर आणि वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या नियुक्त्या जाहीर करण्यात आली.युवराज ठाकरे यांच्या पुनर्नियुक्ती तसेच आणखी काही नवीन चेहऱ्यांना युवासेनेत संधी देण्यात आली आहे त्यात तालुका प्रमुख विक्की चवणे,विधानसभा समन्वयक रोहन परखी तालुका संघटक राहुल पारखी यांचीही वर्णी करण्यात आली आहे.वणी तालुक्यातील शिवसैनिक व युवकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय “गोल्डन अपॉर्च्युनिटी” मानला जात आहे.युवा कार्यकर्त्यांनी म्हटले की, “युवराज ठाकरे यांच्या नेतृत्वात वणी विधानसभा संघटन आणखी बळकट होईल आणि पक्षाचा झेंडा प्रत्येक गावात फडकवला जाईल.” शिंदेसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी हा निर्णय निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.