Tuesday, October 14, 2025
Homeएडवोटोरियलमी अनुभवलेला सच्चा, निस्वार्थी आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणजे रवी बेलूरकर.......

मी अनुभवलेला सच्चा, निस्वार्थी आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणजे रवी बेलूरकर…….

•वाढदिवस विशेष लेख.

Wani:- अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात काम करत असतांना मी अनुभवलेला सच्चा, निस्वार्थी आणि प्रामाणिक कार्यकर्ता म्हणजे रवी बेलूरकर ! त्यांच्या सोबत अनेक वर्षापासून स्पर्धात्मक आणि संघर्षमय परिस्थितीमध्ये निर्भिडपणे, सातत्य व सात्त्विक मनाने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणजे रवी बेलुरकर !

ज्यांनी अतिशय गरीब परिस्थिती मधून जिवनाची सुरुवात केली. जिवनाच्या काटेरी प्रवासात राजकिय आणि सामाजिक प्रवाहात निरपेक्ष वृत्तीने स्वतःला वाहून घेतले. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाल स्वयंसेवक म्हणून काम कले,नंतर कॉलेज कॅम्पस पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये 1993 ते 2002 पर्यंत विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून अविरतपणे स्वतःला समर्पित करून कार्य केले. त्यानंतर 2004 पासून ते 2025 पर्यंत सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडीत त्यांनी आपल्या कामाची पावती दिली. भारतीय जनता पार्टी वणी शहराचे तिनं वर्ष सरचिटणीस नंतर तब्बल नऊ वर्ष वणी शहर अध्यक्ष त्यानंतर जिल्हा सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष, लोकसभा विस्तारक , विधानसभा विस्तारक असा अतुलनीय प्रवास सातत्याने करणारे आणि सातत्याने कार्यरत असणारे रवी बेलुरकर पण कुठेही मोठेपण नाही अगदी साधी राहणी, साधे विचार, कोणासाठीही धावून जाणे, कोणाचं काम निस्पृहपणे केलं असेल तरी मोठेपणा नाही. अनेकांच्या सुख दुःखात स्वतःहून धावून जाणे, प्रत्येकांना हातभार लावणे, कुठेही गाजा वाजा नाही.

वणी शहरातील 2002 पासून रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून मोठ्या प्रमाणात शोभायात्रा ची परंपरा सुरू केली यामध्ये कुठेही हिंदू मुस्लिम वाद निर्माण होऊ दिला नाही, सर्वधर्मसमभाव म्हणून वणी शहराचा वारसा चालविला. जेव्हा रविनी रामनवमीची शोभायात्रा हातात घेतली तेव्हा कुठेही केंद्रात सरकार नव्हती, खासदार नव्हता, महाराष्ट्रात सरकार नव्हती, वणी विधानसभेत आमदार नव्हता पण सातत्याने हातात भगवा घेऊन हिंदुत्वाचा ठसा उमटवायचे काम रवीनी केले. त्यांच्याजवळ एक रुपया नसतानाही भारतीय जनता पार्टीचा झेंडा कधी सोडला नाही. भारतीय जनता पार्टीचे काम करत असतांना वणी शहरांमध्ये बोटावर मोजणारे इतके कार्यकर्ते होते, आमदार नव्हते, सत्ता नव्हती पण सातत्याने काम करत राहणे हेच त्यांचे ध्येय होते कधीही पैशाची लालसा न करता कुठलाही स्वतःवरती डाग लागु न देता निरंतर काम करणे हाच त्यांचा गुणधर्म होता,हिच त्यांच्या कार्याची सुसंवादी शैली होती. महाराष्ट्रात सत्ता व केंद्रात सत्ता असून सुद्धा कुठेही सत्तेचा वापर हा स्वतःसाठी केला नाही. नाहीतर सत्तेच्या उपयोग स्वतःसाठी दारू विकणे असेल, चोरीचा कोळसा विकणे असेल, चोरीची रेती या कुठल्याही दोन नंबरच्या धंद्याला वाहून घेतले नाही किंवा ते कधी लालचेत पडले नाही. निस्वार्थपणे पक्षाचे निरंतर काम करत राहणे, रिक्षावाल्यापासून तर पान ठलेवाल्यापर्यंत, झोपडपट्टी पासून तर सामान्यतल्या सामान्य वर्गांपर्यंत प्रत्येक नागरिकांना घेऊन चालणे सामान्यतल्या सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेणे भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात आणले व सामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक बनविले पक्षाच्या प्रवासात आणि प्रवाहात आणले, पक्षाच्या पदावर बसवून त्यानंतर त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून नगरसेवक, नगरसेविका बनविले .स्वतःसाठी काही न मागता पण कार्यकर्त्यासाठी भांडून त्याला पद देणे, त्याला उमेदवारी देणे त्याला लोकप्रतिनिधी बनवणे यात रवीचा सिंहाचावाटा आहे हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही. सातत्याने सामान्य कार्यकर्त्याला मोठं कसं करता येईल, त्याला चांगल्या कामांना कसे लावता येईल, त्याला राजकारणामध्ये मोठेपण कसे देता येईल हेच त्यांनी बघितले स्वतः कुठल्या पदावर बसले नाही तर अनेक कार्यकर्त्यांना नगरसेवक, सभापती , पक्षाच्या मुख्य पदावरती सन्मान दिला आम्ही बघितलेले हेच ते रवी ज्यांनी 2008 मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे 263 गाईंचे कत्तलखान्याकडे जात असतांना प्राण वाचविले. त्यासाठी मोठा संघर्ष केला वणी न्यायालय, जिल्हा न्यायालय त्यानंतर सर्वोच्च न्यायालयतून न्याय मिळवून दिला. न्यायालयातून केस जिंकले आणि गो मातेच्या हत्या करणाऱ्या खाटकांपासून 263 गाईंना खेचून आणले आणि वणीच्या उज्वल गोरक्षण मध्ये स्वाधीन केले हेच ते रवी! परंतु कुठलेही अपेक्षा कुठल्याही इच्छा न दर्शवता निरंतर कामात राहणे आणि आजच्या देखाव्याच्या दुनियेमध्ये सामान्यातून सामान्य स्थितीतूनआलेला कार्यकर्ता हा कुठेतरी लुप्त होत आहे. पैशाचा मोह न ठेवता, कुणालाही न फसवता कोणासाठीही धावून जाण्यासाठी तत्पर असणारा, सर्वांचे हित बघणारा आम्ही अनुभवलेला रवी ! तर 2019 च्या लोकसभा व विधानसभे मध्ये सर्वात अधिक काम करणारा, प्रत्येक गोष्टीत स्वतःहून लक्ष घ्यालून अमित शहाची जाहीर सभा यशस्वी करणारा मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचे रात्रंदिवस मेहनत करून विधानसभेला जास्तीत जास्त काम करुन निवडणुकीत सिंहाचा वाटा असणारे पण स्वतःचा कधीही मोठेपण दाखवणारा, मी केले ही भावना मनामध्ये न ठेवणारा असा हा सामान्य माणूस म्हणजे रवी बेलुरकर! गरीब परिस्थितीची जाणीव ठेवून स्वतः खंबीरपणे उभे राहून मनापासून पक्षाचे सामाजिक आणि धार्मिक काम करणे त्यांनी यातूनच आंबेडकर चौक येथील दुर्गा माता मंदिराची उभारणी केली. जे दुर्गा माता मंदिर तीस वर्षांपासून दुर्लक्षित होते असे देखणे मंदीर रवी च्या अध्यक्षते खाली निर्माण झाले. कुठेही पैशाचा देखावा न करता सामान्यपणे जीवन जगणे समाजातील प्रत्येक घटकांसोबत प्रत्येकांशी मनमिळाऊ संपर्क असणारा अजातशत्रू असा सर्वांचा लाडका प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा रवी बेलुरकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! आपला प्रामाणिक व सच्चा कार्यकर्ता रवी!

•कुंतलेश्वर तुरविले, वणी

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments