Tuesday, October 14, 2025
HomeBreakingमारेगाव ठाणेदाराला "हार्ट अटॅक.......

मारेगाव ठाणेदाराला “हार्ट अटॅक…….

Ajay kandewar,Wani:- मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश बेसरकर यांना (ता. २३ ) रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या छातीत दाटून आले असता अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळच्या वेळेस त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि काही क्षणांतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. तातडीने त्यांना वणी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

उमेश बेसरकर यांची पुसद बदली होऊन ते मारेगाव येथे कार्यरत झाले होते. कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि जनतेमध्ये लोकप्रिय अशी ठाणेदारांची ओळख होती. त्यांच्या अकस्मात निधनाने मारेगाव शहरासह संपूर्ण यवतमाळ पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. सहकाऱ्यांनी डोळ्यांत पाणी आणून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.“कर्तव्य निभावताना ठाणेदार काळाच्या पडद्याआड गेले, ही आमच्यासाठी न भरून निघणारी पोकळी आहे,” असे भावना व्यक्त करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोकसंदेश दिला.दरम्यान त्यांच्या उमेश बेसरकर यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोळ्याचा बंदोबस्त मारेगाव ठाणेदाराचे होते उत्कृष्ट व्यवस्थापन….

काल (ता.22 )मारेगाव पोलिसांनी पोळा सणानिमित्त शहरात काटेकोर बंदोबस्त ठेवत शिस्तबद्ध वातावरण निर्माण केले. पोळा सण शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पोलिसांनी मुख्य रस्ते, चौक व गावभागात तैनाती करून उत्कृष्ट व्यवस्थापन केले.नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक केले असून, सण कोणत्याही अनुचित प्रकाराविना आनंदात संपन्न झाला होता आणि अचानक तान्हा पोळ्याला सकाळी त्यांना छातीत वेदना जाणवल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments