Ajay Kandewar, Wani:- नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने एकतर्फी विजय मिळवला असला, तरी या विजयामागील सर्वात मोठा आणि ठळक चेहरा म्हणून प्रभाग क्र. ५च्या सोनाली प्रशांत उर्फ छोटू निमकर पुढे आल्या आहेत.भाजपाकडून निवडून आलेल्या १८ नगरसेवकांमध्ये सोनाली निमकर या सर्वाधिक १५७९ मते घेणाऱ्या आणि सर्वाधिक लीड मिळवणाऱ्या एकमेव नगरसेवक ठरल्या असून, त्यांची अधिकृत नोंद ‘लीडिंग विजयी नगरसेवक’ म्हणून झाली आहे.
प्रभाग क्रमांक ५ मधून मिळालेली त्यांची निर्णायक आघाडी ही केवळ आकड्यांची नाही, तर जनतेचा प्रचंड विश्वास, संघटनात्मक ताकद आणि भाजपातील वाढते महत्त्व दर्शवणारी ठोस राजकीय घटना आहे. सत्तास्थापनेत भाजपाचा झेंडा फडकला असला, तरी मतांच्या आघाडीच्या शिखरावर सोनाली निमकर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.यामुळे भाजपामध्ये त्यांचे स्थान आता सामान्य नगरसेवकापेक्षा वरचे, तर वणीचा राजकारणात भविष्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.भाजपाच्या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर, सोनाली निमकर यांचा हा विक्रमी लीड हा पक्षासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला असून, भविष्यातील स्थानिक राजकारणात त्यांचे नाव अधिक ठळकपणे पुढे येईल.

